Film Producer : 'वॉन्टेड' चित्रपटाच्या निर्मात्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, धक्कादायक कारण आले समोर

Film Producer Arrested : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला मुंबईत अटक करण्यात आली आहे. निर्मात्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Film Producer Arrested
Film ProducerSAAM TV
Published On
Summary

'वॉन्टेड' चित्रपटाच्या निर्मात्याला अटक

निर्मात्यावर फसवणुकीचा आरोप

मनोरंजन विश्वाला मोठा धक्का

साम टिव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील पोलीसांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात कारवाई करत भोजपुरी चित्रपटसृष्टीतील निर्माता जसवंत कुमार याला अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

अभिनेता पवन सिंह यांच्या 'वॉन्टेड' या चित्रपटाचा निर्माता असलेल्या जसवंत कुमार याच्यावर चित्रपटासाठी आर्थिक गुंतवणूक उभारण्याच्या नावाखाली एका गुंतवणूकदाराकडून ७८ लाख रुपये घेतल्याचा आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ती रक्कम परत न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने दीर्घकाळ तपासात सहकार्य केले नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) जारी केले. वॉरंटच्या आधारे उत्तर प्रदेशातील पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड परिसरातून जसवंत कुमार याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला पुढील तपासासाठी वाराणसीकडे रवाना केले.

Film Producer Arrested
Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्व शोकसागरात

या प्रकरणात आर्थिक फसवणुकीसंदर्भातील व्यवहार, गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे आणि इतर पुराव्यांची तपास यंत्रणांकडून छाननी सुरू असून, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com