Ankush Chaudhary Natak  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankush Chaudhary: 'तोडी मिल फँटसी' सारखं नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा; म्हणाला,'आजवर अनेक भाषांमध्ये...'

Ankush Chaudhary Natak : सृजनशील युवा कलाकारांनी आणलेल्या ‘तोडी मिल फँटसी’ या रॉक म्युझिकल नाटकासासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थने सहकार्याचा हात पुढे केला आहे.

Shruti Vilas Kadam

Ankush Chaudhary: वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सक्रिय असूनही अनेक तरुण कलावंतांनी वाट धरली आहे ती रंगभूमीची. प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावू पाहणारी सृजनशील युवा पिढी त्यांना पडणारे प्रश्न नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडतायेत. रंगभूमीवर सध्या येत असलेले विषय तरुण पिढीला भावताहेत. ज्यावर संवाद घडण्याची गरज असते असे विषय हाताळले जात आहेत. अशाच काही सृजनशील युवा कलाकारांनी आणलेल्या ‘तोडी मिल फँटसी’ या रॉक म्युझिकल नाटकासासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थने सहकार्याचा हात पुढे केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, त्यावेळी अभिनेता अंकुश चौधरी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आणि नाटकातील कलाकार मंडळी उपस्थित होती.

या नाटकाला सहकार्य करण्याबद्दल अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, ‘ नव्या उमद्या काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांसाठी मी काय करू शकतो? तर त्यांना सहकार्य करू शकतो, म्हणून हा सहकार्याचा हात. या सहकार्याला अनुभवी अशा जिगीषा अष्टविनायक संस्थेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने ‘तोडी मिल फँटसी’ हे नाटक आता चांगल्या प्रकारे पोहचेल याची खात्री त्यांनी बोलून दाखविली. ‘तोडी मिल फँटसी’ सारखं उच्च दर्जाचं ब्रॉडवे नाटक ज्याचे जगभरात एकाच दिवशी अनेक प्रयोग होतील असं नाटक करण्याची इच्छा अंकुशने यावेळी बोलून दाखविली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी असं नाटक आणलं तर आपण नक्कीच रंगभूमीवर पुनरागमन करू असं अंकुशने सांगताच, चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यास सहमती दर्शवली.

गिरण्यांच शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मुंबई बद्दलली गिरण्या इतिहासजमा होऊन त्यांची जागा आलिशान मॉल्स आणि पब्सनी घेतली. पूर्वीं गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मूल आज त्याच मॉलमध्ये हाऊस किपिंगची काम करतात. मात्र आजूबाजूच्या चकचकीतपणाची भुरळ त्यांना पडल्याशिवाय रहात नाही. आणि जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकतं आणि इथेच जन्म घेते ती म्हणजे फॅन्टसी.. याच फॅन्टसी वर बेतलेलं गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार हे नाटक.

सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित ‘तोडी मिल फॅन्टसी’ या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके, जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या नाटकाचे प्रयोग शुक्रवार १८ एप्रिल रात्रौ ८.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे, १९ एप्रिल रात्रौ ८.३० वा. कालिदास नाट्यगृह मुलुंड, २० एप्रिल रात्रौ ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर माटुंगा या ठिकणी रंगणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT