
Priya Prakash Varrier Social Media Post: ‘ओरू अडार लव्ह’ मधील प्रसिद्ध विंकने चर्चेत आलेली प्रिया प्रकाश वॉरिअर आता तमिळ चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ मधून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. तिच्या उत्तम अभिनयासाठी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रशंसा होत आहे. चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रियाने एक भावनिक पोस्ट शेअर करत अभिनेता अजीत कुमारबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या.
अजीत कुमारसाठी खास पोस्ट
इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्रियाने अभिनेता अजीतच्या नम्रतेचे आणि सर्वांसोबत एकसमान वागणुकीचे भरभरून कौतुक केले. तिने लिहिले की, पहिल्या संभाषणापासून ते शूटिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत, तुम्ही मला तुमच्यातील एक समजले. कधीच मला तुमच्यामुळे वगळलेले वाटले नाही. तुम्ही सेटवर असताना आमच्या सर्वांची काळजी घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. क्रूझवर आम्ही एकत्र टीम म्हणून जेवलो, मजा केली आणि सर्वोत्तम वेळ घालवला. इतकी उत्सुक मी कधीच कोणाला भेटल्यावर झाले नव्हते. तुमची खूप मोठी चाहती मुलगी असे तिने लिहले.
‘थोट्टू थोट्टू’ गाण्यावर अजीतसोबत डान्स
या चित्रपटातील 'थोट्टू थोट्टू' गाण्यावर अजीतसोबत डान्स करणे हे तिच्यासाठी विशेष अनुभव ठरल्याचे पुढे प्रियाने सांगितले. तिने लिहिलं की, ही आठवण ती नेहमी हृदयात जपून ठेवेल. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते तिच्या भावनांचा सन्मान करत तिचे कौतुक करत आहेत.
तमिळ सिनेमात जम बसवणारी नवी अभिनेत्री
‘गुड बॅड अग्ली’ मध्ये अजीतसोबत त्रिशा, अर्जुन दास आणि सिमरन यांच्याही महत्वपूर्ण भूमिका होत्या. पण, या चित्रपटातील प्रिया प्रकाशचा अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. तमिळ सिनेसृष्टीत तिची क्रेझ वाढत असून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक वाटत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.