मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh kothare ) कायम त्याच्या चित्रपटासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे आजही चाहते दिवाने आहेत. त्याचे जुने चित्रपट आजही लोकांना खळखळून हसवत आहेत. मात्र सध्या महेश कोठारे हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.
एका मिडिया मुलाखतीत महेश कोठारे यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडून घडलेल्या एका चुकीची कबूली दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, महेश कोठारे यांचे एका चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले. त्यांचा 'दे दणादण' (De Danadan) हा मराठी चित्रपट खूप गाजला. 'दे दणादण' चित्रपट 1987ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात महेश कोठारे यांच्यासोबत लक्ष्मीकांत बेर्डे देखील पाहायला मिळाले. या जोडीने प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन केले. आजही हा चित्रपट पाहून खूप हसायला येते.
'दे दणादण'चित्रपटाचा महेश कोठारेंनी 'लो में आ गया' नावाने हिंदी रिमेक केला. मराठी चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे त्यांनी हिंदी रिमेक केला. या चित्रपटात विनय आनंद, लक्ष्मीकांत बेर्डे, रीमा लागू, मोहन जोशी, प्रेम चोप्रा यांसारखे मोठे कलाकार पाहायला मिळाले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटासाठी महेश कोठारे यांनी 15 वर्ष कमावलेले सर्व पैसे लावले होते. 'लो में आ गया' (Lo Main Aa Gaya) हा चित्रपट 1999 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला.
महेश कोठारे यांनी चित्रपटासाठी लावलेले पैसे देखील वसूल झाले नाहीत. त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का बसला आणि यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांच्या कर्जाचा डोंगर वाढला. चित्रपटाच्या अपयशामुळे त्यांना राहते घरही विकावं लागले. मात्र या संकटावर मात करत महेश कोठारे यांनी पुन्हा आपल्या करिअरला सुरूवात केली आणि आता मोठे नाव कमावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.