Laxmikant Dixit : अयोध्या राममंदिराची प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित कालवश, देशभरातील भक्तांवर शोककळा

Laxmikant Dixit dies : योध्या राममंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन झालं आहे. मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाने भक्तांवर शोककळा पसरली आहे.
अयोध्या राममंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित कालवश, देशभरातील भक्तांवर शोककळा
Laxmikant DixitSaam tv
Published On

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आचार्य मागील काही दिवसांपासून आजारी होते.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात १२१ पुजाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या पुजाऱ्यांचं नेतृत्व लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केलं होतं. आज सकाळी ६.४५ वाजता दीक्षित यांचं निधन झालं. त्यांचा मृतदेह सध्या घरी असून मणिकर्णिका घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधानाने काशीसहित देशभरातील भक्तांवर शोककळा पसरली आहे. पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांचं निवासस्थान मंगलागौरीहून निघणार आहे.

अयोध्या राममंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित कालवश, देशभरातील भक्तांवर शोककळा
Factory Boiler Blast : मध्यरात्री भीषण अग्नितांडव! कारखान्यातील बॉयलरचा स्फोट; २ कामगारांचा मृत्यू

आचार्य लक्ष्मीकांत यांचा सामावेश काशीतील मोठ्या पंडितामध्ये सामावेश होतो. त्यांचा भारतीय सनानत संस्कृती आणि परंपरेवर आस्था होती. लक्ष्मीकांत हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद कॉलेजचे वरिष्ठ आचार्य होते. या कॉलेजची स्थापना काशी नरेश यांच्या मदतीने झाली.

लक्ष्मीकांत दीक्षित यांचा महाराष्ट्रातील सोलापूरमधील जेऊरचे राहाणारे होते. दीक्षित यांच्या पीढीतील लोक काशीत वास्तव्यास आले होते. लक्ष्मीकांत यांनी वेद आणि अनुष्ठानची दीक्षा ही काका गणेश दीक्षित यांच्याकडून घेतली होती.

अयोध्या राममंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित कालवश, देशभरातील भक्तांवर शोककळा
Israel Hamas War: गाझामधील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायलचा मोठा हल्ला; २५ पॅलेस्टिनी ठार, शेकडो जखमी

जानेवारी महिन्यात अयोध्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील मुख्य पुजाऱ्याची भूमिका निभावणारे काशी विश्वनाथ कॉरिडोरचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं होतं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकातही दीक्षित कुटुंबातील व्यक्तींनी योगदान दिलं आहे.

पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाची माहिती मिळताच सनातनी परंपरा मानणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या पुजारींनी दीक्षित यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com