The Family Man 3 Update Instagram @familymanamazon
मनोरंजन बातम्या

The Family Man Update: 'द फॅमिली मॅन'च्या फॅन्ससाठी बातमी; नवीन सीजन येणार असल्याची स्वतः मनोज वायपेयीने दिली माहिती

The Family Man 3: मनोज बाजपेयीने 'द फॅमिली मॅन 3' बद्दल एक मोठी सूचना केली आहे.

Pooja Dange

Manoj Bajpayee Talks About The Family Man 3: मनोज बाजपेयी यांची 'द फॅमिली मॅन' ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय भारतीय वेबसीरीज आहे. हा क्राईम ड्रामा प्रेक्षकांना खूप आवडला. 'द फॅमिली मॅन'चे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रेक्षक आता वेबसीरीज तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मनोज बाजपेयीने 'द फॅमिली मॅन 3' बद्दल एक मोठी सूचना केली आहे.

नुकतेच, मनोज बाजपेयी यांनी News18 च्या रायझिंग इंडिया समिटमध्ये उपस्थित राहिले होते. जेथे त्यांनी 'द फॅमिली मॅन 3' बद्दल सांगितले. अभिनेत्याला सीझन 3 विषयी विचारण्यात आले.

वेबसीरीजमधील स्वतःच्या भूमिकेचा नक्कल करत मनोज म्हणले, “आज सकाळी एक पक्षी उडून माझ्या खिडकीवर येऊन बसला आणि तेव्हाच मला म्हटलं की कदाचित आपण या वर्षाच्या शेवटी शूट करू शकतो. जर आम्ही आणि पैसे वाचले तर सर्व काही ठीक झालं तर कदाचित नक्की करू."

फॅमिली मॅन सीझन 2 2021 मध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून चाहते सीझन 3ची खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरीजमध्ये मनोज बाजपेयी रॉ एजंट, एक चांगला पिता आणि नवरा असा जीवनात संघर्ष करत आहे.

पहिल्या भागात तो दहशतवाद्यांशी लढला, तर दुसऱ्या सत्रात दक्षिण भारतीय डिवा समंथा रुथ प्रभूशी लढताना दिसला. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या वेबसीरीजच्या दुसऱ्या भागात शेवटी श्रीकांत कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना दिसणार आहे, अशी हिंट देण्यात आली होती.

राज आणि डीकेची वेबसीरीज फर्जी मध्ये 'द फॅमिली मॅन' मनोज बाजपेयी आणि चेल्लम सर यांनी कॅमिओ केला होता. शाहिद कपूरने या वेबसीरीज ओटीटीच्या जगात पाऊल ठेवले. तर मनोज बाजपेयी नुकताच गुलमोहर या चित्रपटात दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT