Rutuja Bagwe Post: लहानपणी ५ रुपये पॉकेट मनी असणाऱ्या ऋतुजाने घेतलंय लाखोंचं घर, लेकीची स्वप्नपूर्ती झाल्याने आई-बाबा खुश

New Home Of Rutuja Bagwe: ऋतुजाने स्वतःचं घर खरेदी केलं आहे.
Rutuja Bagwe Buy Her Dream Home
Rutuja Bagwe Buy Her Dream Home Saam TV

Rutuja Bagwe Buys Her Dream Home: अभिनेत्री ऋतुजा बागवेने झी मराठीवरील 'नंदा सौख्य भरे' या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले. तिची ही मालिका खूप गाजली. त्यानंतर ऋतुजा 'अनन्या' या नाटकात दिसली होती. तिचे हे नाटक खूप गाजले. या नाटकातील भूमिकेसाठी तिने घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक झाले.

आता आणखी एक कौतुकास्पद गोष्ट ऋतुजाच्या आयुष्यात घडली आहे. ऋतुजाने स्वतःचं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट ऋतुजाने तिचा हा आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे.

Rutuja Bagwe Buy Her Dream Home
Salman Khan At NMACC Opening: सलमानला पाहताच शाहरुखचा लेक धावला.. सलमानचं किंग खानच्या कुटुंबासोबत खास फोटोसेशन

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत ऋतुजाने ही बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये ऋतुजासोबत तिचे आई-बाबा देखील दिसत आहेत. सगळेच जसे स्वतःच घर खरेदी केल्यावर आनंदी होतात, तसाच आनंद ऋतुजाच्या चेहऱ्यावर देखील दिसत आहे. ऋतुजाने तिच्या घरची झलक देखील या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.

तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, शाळेत असताना बाबा ५रू. पॉकेट मनी द्यायचे. ३रू. खर्च करुन २रू. गल्ल्यात टाकायचे. कधी कधी काहीही न घेता ५रू. Piggy Bankमधे टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, small sacrifices, आई बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे शक्य झालं. घर आणि घराला घरपण देणारी माझी माणसं.' तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक मराठी कलाकार तिचे अभिनंद करत आहेत.

ऋतुजा बागवे लवकरच प्लॅनेट मराठीच्या 'कंपास' या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरीजमध्ये तिच्यासह उर्मिला कोठारे, स्वानंदी टिकेकर, सुयश टिळक आणि आनंद इंगळे देखील दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com