Manoj Bajpayee And Nawazuddin Siddiqui New Film
Manoj Bajpayee And Nawazuddin Siddiqui New Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee And Nawazuddin Siddiqui New Film: ‘गँग्स ऑफ वासोपुर’ नंतर नवाज आणि मनोज पुन्हा एकत्र येणार; पण थिएटरमध्ये नाही तर...

Chetan Bodke

Manoj Bajpayee And Nawazuddin Siddiqui New Film: बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे दोघेही बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे ओळखले जातात. आधीपासून चांगले मित्र असलेले अभिनेत्यांनी ‘गँग्स ऑफ वासोपुर’ चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यात मनोजने नवाजच्या वडिलांची भूमिका साकारली होती. पण तरी सुद्धा, दोघांचा एकही सीन एकत्र नव्हता. बेस्ट फ्रेंड आता लवकरच एकाच फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण यांचा आगामी चित्रपट थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

या दोघांनीही अनेकदा ओटीटीसाठी काम केले आहे, पण त्यांनी एकत्र काम केले नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी ओटीटीवर एकत्र पाहायला मिळणार आहे. (Bollywood Film)

कदाचित अनेकांना माहित नसेल, 'शूल' मध्ये मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होते, मनोजसोबत चित्रपटात नवाझुद्दिन सिद्दीकी आणि रवीना टंडन एकत्र जेवायला जातात. त्या रेस्टॉरंटमध्ये मनोजने वेटरची भूमिका केली होती. तेव्हापासून त्याची बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण होत गेली.

मनोज बाजपेयी सध्या कोर्टरूम ड्रामा असलेल्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मध्ये मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात त्याने एका वकिलाची भूमिका साकारली.

तर नवाजचे अनेक आगामी चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. सोबतच नवाजचा ‘हड्डी’ हा चित्रपट देखील बराच चर्चेत आहे.

नवाजच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, पत्नी आलिया आणि मुलातील वाद बराच चर्चेत राहिला आहे. त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर त्याच्यासाठी लांब लचक पत्र लिहित सर्व खटले मागे घेत असल्याचे सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Effects of Green Tea : डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Ghatkopar News: होर्डिंग्ज मालकासह सर्व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, दानवेंची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मागणी

Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच

Tips to Increase Memories: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे नवे प्रयोग करून बघा!

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृत्यूंचा आकडा १७ वर

SCROLL FOR NEXT