Jr NTR-Janhvi Kapoor Movie First Look: ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरच्या चित्रपटाचे नाव ठरलं; फर्स्ट लूक प्रदर्शित

Devara 1st Look Out: ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाचे नाव देवरा आहे.
Jr NTR-Janhvi Kapoor Movie First Look
Jr NTR-Janhvi Kapoor Movie First LookSaam TV

Janhvi Kapoor- Jr NTR Devara Release Date Comfited: 'आरआरआर' फेम ज्युनियर एनटीआर सध्या कोरताला शिवासोबत एका अॅक्शन एंटरटेनर चित्रपटात काम करत आहे. ज्युनियर एनटीआरचा हा अभिनेत्याचा 30 वा चित्रपट आहे, ज्याला चाहत्यांनी NTR30 असे नाव दिले होते.

या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील दिसणार आहेत. अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाचे अधिकृत टायटल जाहीर केले आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. चला तर पाहूया ज्युनियर एनटीआरचा फर्स्ट लूक. (Latest Entertainment News)

Jr NTR-Janhvi Kapoor Movie First Look
Priyanka-Nick At Cannes: नवरा असावा तर असा.. प्रियंकाला पावसापासून वाचवण्यासाठी निक जोनासने केलेल्या या खास कृतीने सर्वांनी वेधलं लक्ष

ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाचे नाव देवरा आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी ज्युनियर एनटीआरचा लूक दाखवला आहे. पोस्टरमध्ये अभिनेता हातात हत्यार घेऊन उभा आहे. तर त्याच्या पुढ्यात अनेक मृतदेह देखील दिसत आहेत. काळ्या कपड्यांमधील एनटीआरचा स्वॅग पाहून त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट भारताच्या किनारपट्टीवर आधारित असल्याचे निर्मात्यांनी आधी सांगितले होते.

'देवरा' या चित्रपटात जान्हवी कपूर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान देखील या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. एनटीआर आर्ट्स आणि युवा सुधा आर्ट्सच्या बॅनरखाली हरी कृष्ण के आणि मिक्किलीनेनी सुधाकर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे.

निर्मात्यांनी ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'च्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या वर्षी 5 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com