Priyanka-Nick At Cannes: नवरा असावा तर असा.. प्रियंकाला पावसापासून वाचवण्यासाठी निक जोनासने केलेल्या या खास कृतीने सर्वांनी वेधलं लक्ष

Nick Holds Umbrella For Priyanka: निकने प्रियांकाच्या डोक्यावर देखील छत्री धरली होती.
Nick Holds Umbrella For Priyanka
Nick Holds Umbrella For Priyanka
Published On

Priyanka Chopra - Nick Jonas In Cannes 2023: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास नेहमीच चर्चेत असतात. दोघेही कान्स फिल्म फेस्टिवल २०२३च्या रेड कार्पेटवर दिसले. पण यावेळी निकने प्रियांकासाठी जे काही केले ते कौतुकास्पद होते.

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकत्र दिसले. यावेळी दोघेही संपूर्ण व्हाईट आऊटफिटमध्ये आले होते. दोघांनी ट्विनिंग केले होते. प्रियांका आणि निक जेव्हा कान्सच्या रेड कार्पेटवर आले तेव्हा पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे निकने छत्री कॅरी केली होती. निकने प्रियांकाच्या डोक्यावर देखील छत्री धरली होती. पावसात त्या छत्रीसह दोघांनी पोज देखील दिल्या. (Latest Entertainment News)

Nick Holds Umbrella For Priyanka
Sameer Wankhede-Shah Rukh Khan Chats: बाप म्हणून विनंती आहे, मी काहीही करायला तयार; शाहरुख-वानखेडेंमधील Whatsapp चॅटमध्ये नेमकं काय आहे? वाचा

निक जोनास एक जेंटलमेन आहे हे दिसून आले. निकच्या या वागणुकीमुळे सगळेच इम्प्रेस झाले. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव आहेत. कान्समधील या दोघांचे रेड कार्पेटवरील फोटोमध्ये देखील त्यांचे प्रेम दिसत आहे.

कन्समधील प्रियांकाच्या आऊटफिटविषयी बोलायचे झाले तर, तिने लॉन्ग व्हाईट गाऊन घातला होता. या गाऊनवर तिने हाय पोनीटेल बांधली होती. प्रियंकाने लूक अजून सुंदर करण्यासाठी व्हाईट डायमंड ज्वेलरी घातली होती. तिचा मेकुओप देखील मिनिमल होता.

कान्समध्ये निक देखील ऑल व्हाईट लूकमध्ये आला होता. त्या व्हाईट सूट आणि बो घातला होता. तसेच त्याच्या हातात त्याची एंजमेंट रिंग उठून दिसत होती.

निकने प्रियांकासाठी मदर्स डे दिवशी देखील पोस्ट केली होती. या पोस्टच्या माध्यमातून निकने प्रियांकाचे कौतुक केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com