Mamta Kulkarni Takes Sanyas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी यांनी घेतला संन्यास, नावही बदलले; महाकुंभमेळ्यात केली अध्यात्मिक जीवनाची सुरुवात

Mamta Kulkarni News : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला आहे. किन्नर आखाड्याने त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी दिली आहे. संन्यास घेतल्यानंतर त्यांचे नावदेखील बदलले आहे.

Yash Shirke

Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी महाकुंभमेळ्यात संन्यास घेतल्याची घोषणा केली. त्यांनी किन्नर आखाड्यात संन्यास घेतल्याची माहिती समोर आली आहे. संन्यास घेतल्यानंतर त्यांचे नाव देखील बदलले आहे. त्यांनी संन्यासी जीवनासाठी श्री यामाई ममता नंद गिरि असे नाव धारण केले आहे. आज (२४ जानेवारी) दुपारी ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेतला.

ममता कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांनी महाकुंभमेळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. महाकुंभमेळ्यात पोहोचल्यानंतर त्यांनी केशरी रंगाचे कपडे परिधान केले. महेशाद्रानंद गिरि यांच्याकडे त्यांनी मुक्काम केला आहे. किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची ममता यांनी भेट घेतली. तेव्हा जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अम्बानंद गिरिदेखील तेथे उपस्थित होते.

ममता कुलकर्णी यांनी आखाड्यातील प्रमुखांसह महाकुंभमेळ्याची प्रशंसा केली. त्यांनी गंगा स्नान देखील केले. आखाड्याचे आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी यांना भिक्षा दिली. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णी यांनी केशरी रंगाचे कपडे परिधान केले. त्यांचे महाकुंभमेळ्यातले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ममता कुलकर्णी नव्वदीच्या दशकामधील बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होत्या. त्यानंतर १२ वर्ष त्या अभिनय क्षेत्रापासून लांब राहिल्या. त्यांनी या काळात मेकअप करणे देखील सोडले होते. आधात्मिक ओढ निर्माण झाल्याने त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभमेळ्याला भेट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

Jalna Rain : पावसाचा कहर; जालन्यात अतिवृष्टीत ९३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Accident: पिंपरीमध्ये अपघाताचा थरार! भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं, जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT