Hawa Hawai Cinema  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hawa Hawai Movie: हवाहवाई सिनेमात 'या' मल्याळम अभिनेत्रीची एन्ट्री; पण मुक्ता बर्वेचा चित्रपटाला रामराम

मराठी सिनेमा ' हवाहवाई' मध्ये सर्वात आधी मुक्ता बर्वेला विचारण्यात आले होते, पण नंतर या चित्रपटात मुख्य भूमिकेत मल्याळम अभिनेत्री निमिषा संजय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुक्ता बर्वे (Mukta Barve) नेहमीच आपल्या कलाकृतीने चाहत्यांचे मनोरंजन करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्तचा बहुचर्चित आणि उत्तम आशय असलेला 'वाय' (Marathi Movie) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो चित्रपट तिच्या उत्तम कलाकृतीने आणि तिच्या अभिनयाने चांगलाच नावारुपाला आला होता. सध्या महेश टिळेकर दिग्दर्शित 'हवाहवाई' चित्रपटाची चर्चा जोरदार चालू आहे. 'द ग्रेट इंडियन किचन' आणि 'मलिक' चित्रपटात मल्याळम अभिनेत्री निमिषा संजय (Nimisha Sanjay) मुख्य भूमिकेत होती. निमिषा 'हवाहवाई' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.

सर्वात आधी 'हवाहवाई' (Hawa Hawai) चित्रपटात निमिषाच्या ऐवजी मुक्ता बर्वेला विचारण्यात आले होते. परंतू मुक्ताला कोरोनाची लागण झाल्याने तिने हा चित्रपट नाकारला. सोबतच सोनी मराठीवरील 'अजून ही बरसात' आहे. या मालिकेत मुक्ताचे मिरा नावाचे पात्र होते, ती या मालिकेत उमेश कामत सोबत मुख्य भूमिकेत होती. मुक्ताला मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने चित्रपटाला रामराम ठोकला.

हवाहवाई सिनेमात मुख्य भूमिकेत निमिषा सोबतच वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, अतुल तोडणकर, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मुख्य बाब म्हणजे चित्रपटातील एका गाण्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88व्या वर्षी उडत्या चालीचे एक गाणे गायले आहे. गायिका उर्मिला धनगरच्या ठसकेबाज आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी ‘हवाहवाई’ सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलनाची धुरा महेश टिळेकर यांनी पेलली आहे. येत्या 7 ऑक्टोबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT