Joseph James Manu Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Joseph Manu James: प्रसिद्ध ३१ वर्षीय चित्रपट निर्मात्याचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

केरळमधील सर्वात तरुण चित्रपट निर्माता जोसेफ मनू जेम्सचे २४ फेब्रुवारी रोजी एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील रुग्णालयात निधन झाले.

Chetan Bodke

Joseph Manu James Passes Away: केरळमधील सर्वात तरुण चित्रपट निर्माता जोसेफ मनू जेम्सचे २४ फेब्रुवारी रोजी एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील रुग्णालयात निधन झाले. 31 वर्षीय जोसेफची तब्येत बिघडल्याने त्याला राजागिरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जोसेफला न्यूमोनियाचे निदान झाल्याची माहिती मिळत आहे. जोसेफचा पहिला आगामी चित्रपट 'नॅन्सी रानी' लवकरच प्रदर्शित होणार होता. जेम्सच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

अहाना कृष्णा आणि अर्जुन अशोकन यांनी जोसेफ मनूच्या पहिल्या चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाचे नाव 'नॅन्सी राणी'असे आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. त्याचवेळी जोसेफच्या मृत्यूमुळे खूप दु:ख झालेल्या अहानाने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, "भावपूर्ण श्रद्धांजली मनू! हे तुझ्यासोबत घडायला नको होते."

जोसेफ मनूचा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात होता. या चित्रपटात अहाना कृष्णकुमार, अर्जुन अशोकन, अजू वर्गीस, श्रीनिवासन, इंद्रांस, सनी वेन, लीने, लाल आणि इतर सारखे ज्येष्ठ कलाकार देखील आहेत. शोक व्यक्त करताना अजूने जोसेफचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, "मित्रा फार लवकर सोडून गेलास."

जोसेफ मनूने 2004 मध्ये अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने साबू जेम्सच्या 'आय अॅम क्युरियस' या चित्रपटात लहान मुलाची भूमिका साकारली होती. पुढे त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण केली. जेम्सवर रविवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता मेजर आर्चीपिस्कोपल मार्थ मरियम आर्कडेकॉन चर्च, कुरविलंगड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Maharashtra Live News Update: - सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT