Nikita Ghag Award Conferred The Prestigious Award
Nikita Ghag Award Conferred The Prestigious AwardInstagram/ @nikkitaghagofficial

Dada Saheb Phalke Award: "माझी लायकी..." प्रसिद्ध मॉडेलने 'दादासाहेब फाळके पुरस्कार' परत केला, 'हे' मोठं कारण देऊन पुरस्कार नाकारला...

निकिताने गेल्या वर्षी मिळालेला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

Nikita Ghag Latest News: सामाजिक कार्यातून आपले नाव कमवणाऱ्या मॉडेल निकिता घागने भारत सरकारतर्फे दिला जाणारा चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवले आहे. निकिताने गेल्या वर्षी मिळालेला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने सुरू असलेला हा घोटाळा उघड करणे अत्यंत गरजेचे असल्याचं म्हणत हा पुरस्कार ती परत करत आहे.

Nikita Ghag Award Conferred The Prestigious Award
TV Serial: गुढ अंधारमय जगाची उलटी वाट, थरकाप उडवणार भितीची लाट! नवी रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला..

निकिताच्या मते,दादासाहेब फाळके यांच्या नावाने भारत सरकार हा सर्वोच्च पुरस्कार देतात हे माझ्यासारख्या अनेक नव्या कलाकारांना माहित नाही. दादासाहेबांचा सन्मान राखण्यासाठी या अशा अनेक पुरस्कारांवर बंदी घालण्याची मागणी निकिताने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. सिनेसृष्टीतील महत्वाचा पुरस्कार मिळण्यासाठी सर्वच कलाकार दिवस रात्र बरीच मेहनत घेत असतात. पहिल्यांदाच एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीला मिळालेला दादासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

Nikita Ghag Award Conferred The Prestigious Award
Premat Padloy Love Song: रोमिओ ज्यूलिएटचं खास लव्हसाँग येणार लवकरच चाहत्यांच्या भेटीला, नवी जोडी प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवणार

मॉडेल निकिता घाग, गेल्या नऊ वर्षांपासून Dawa India ही प्राण्यांसाठी ही संस्था चालवते. ती या संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, 'आम्हाला कोणत्याही चांगल्या कामासाठी पुरस्कार मिळाला तर ते आम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणा देते. कोणत्याही चांगल्या सामाजिक कार्याचे कौतुक करणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे, पण मला मिळालेल्या 'दादासाहेब फाळके' पुरस्कारामागे एक संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे, हे गेल्या तीन-चार दिवसांतच मला कळले.'

Nikita Ghag Award Conferred The Prestigious Award
Labhale Amhas Bhagya: प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाची भेट

दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त एका हिंदी संकेतस्थळाला 'अमर उजाला'शी खास बातचीत करताना म्हणाले, 'दादासाहेब फाळकेंच्या नावाने पुरस्कार देण्यासाठी जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही भारत सरकारचे फार ऋणी आहोत. सिनेसृष्टीत दिल्या जाणाऱ्या या सर्वात मोठ्या पुरस्कारामुळे आज दादासाहेब फाळके यांना सर्वजण ओळखतात. पण, या पुरस्कारांच्या नावाने लोक दुकाने चालवतात तेव्हा वाईट वाटते. एकीकडे अमिताभ बच्चनसारख्या व्यक्तिमत्त्वाला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाते आणि दुसरीकडे मुंबईत फाळके यांच्या नावाने कोणीही पुरस्कार देऊन जातो हे पाहून वाईट वाटते.'

Nikita Ghag Award Conferred The Prestigious Award
Amruta Khanvilkar: 'चंद्रा' ची नवी भूमिका, पडद्याआड अमृताची रहस्यमय नजर, सिनेमाचा विषय काय?

यासंदर्भात निकिता घाग सांगते की, ' मी तरुण कलाकारांना, विशेषत: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना आवाहन करते, ज्यांनी यावर्षीचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला आहे, त्यांनी हा खोटा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' परत करावा जेणेकरून या नावाचे पावित्र्य काय आहे हे जगाला कळेल.'

Nikita Ghag Award Conferred The Prestigious Award
'अब मजा आयेगा ना भिडू...' कॉमेडीचे त्रिकूट थेट परदेशात करणार Hera Pheri 3

निकिता घागने आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग विश्वात मोठे नाव कमावले आहे. जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय सौंदर्य उत्पादनांसाठी मॉडेलिंग केलेल्या निकिताची इच्छा आहे की नवीन पिढीने आपले निर्णय हुशारीने घ्यावेत आणि राष्ट्रीय पुरस्काराच्या नावाचा फायदा घेण्यासाठी तयार केलेल्या अशा पुरस्कारांपासून दूर राहावे. ती म्हणते, "दादासाहेब फाळके पुरस्काराचा सन्मान राखला जावा आणि यासारख्या नावांच्या पुरस्काराने नवीन पिढीची दिशाभूल होऊ नये. यासाठी मी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाही याबाबत पावले उचलण्याचे आवाहन करते."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com