matrubhumi
मनोरंजन बातम्या

Minu Muneer: लोकप्रिय अभिनेत्यांकडून शारीरिक शोषण; थेट नाव घेत मल्याळम अभिनेत्रीने सांगितली 'बॅड टच'ची आपबीती

Bharat Jadhav

मल्याळम चित्रपट अभिनेत्री मीनू मुनीरने ज्येष्ठ कलाकारांबद्दल धक्कादायक खुलासा केला. मुकेश एम आणि जयसूर्या यांच्यावर शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीने फेसबुकवर पोस्ट वर हे आरोप केलेत. मुकेश, मणियानपिल्ला राजू, इदवेला बाबू आणि जयसूर्या यांनी शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केलाय.

अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्येल लिहिले की,- 'माझ्यावर शारीरिक आणि शाब्दिक शोषण झाले. २०१३ मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असताना माझ्यावर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार झालेत. सहकार्य करून काम करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर शिवीगाळ असह्य झाली. 'मला मल्याळम इंडस्ट्री सोडून चेन्नईला जाण्यास भाग पाडल्या गेलं. मी लेखातून या शोषणाविरुद्ध आवाज उठवला होता. माझ्यावर झालेल्या सर्व शोषणाविरुद्ध आणि न्यायासाठी याचना करतेय. त्यांच्या घृणास्पद कृत्याविरुद्ध मी मदतीची याचना करतेय.

एनडीटीव्हीशी बोलताना अभिनेत्रीने तिच्यावर बेतलेली आपबीती सांगितली. 'चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला खूप वाईट अनुभव आला. मी टॉयलेटला गेले होते आणि जेव्हा मी परत आले तेव्हा जयसूर्याने मला मागून पकडलं आणि माझ्या संमतीशिवाय माझे चुंबन घेतलं. मला धक्काच बसला आणि पळत सुटले. अभिनेत्याने एक ऑफर दिली होती. जर ती त्याच्यासोबत राहिली तर तो तिला काम देणार असा आरोप अभिनेत्रीने केलाय.

'मल्याळम इंडस्ट्रीमध्ये खूप शोषण होतं. मी साक्षीदारही आहे आणि पीडितही आहे. जेव्हा मी चेन्नईला गेले तेव्हा मला कोणीही विचारले नाही की काय झाले? अभिनेत्री रेवती संपतनेही अभिनेता सिद्दीकीवर गंभीर आरोप केले आहेत. रेवतीने सिद्दीकी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT