Meena Ganesh Saam Tvv
मनोरंजन बातम्या

Meena Ganesh: अभिनेत्री मीना गणेश याचं निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Meena Ganesh Passed Away: मल्याळम प्रसिद्ध अभिनेत्री मीना गणेश याचं निधन झालं आहे. मीना गणेश यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मीना यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Manasvi Choudhary

मल्याळम प्रसिद्ध अभिनेत्री मीना गणेश याचं निधन झालं आहे. मीना गणेश यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मीना गणेश यांना स्ट्रोक घाताचा झटका आल्याने मागील अनेक दिवसांपासून त्या रूग्णालयात दाखल होत्या याचदरम्यान उपचार सुरू असताना मीना गणेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मीना गणेश यांच्या निधनाने मल्याळम् सिनेसृष्टीत शोककला पसरली आहे.

मीना गणेश यांनी ८१ वर्षाच्या होत्या. केरळमधील शोरानूर येथील खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मीना गणेश यांच्या जाण्याने मल्याळम सिनेसृष्टीसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मीना गणेश यांचा चाहतावर्ग मोठा आहे.मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी मीना गणेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मीन गणेश यांनी अत्यंत कमी वयात अभिनयाला सुरूवात केली. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी नाटके करण्यास सुरूवात केली. मल्याळम सिनेसृष्टीत त्यांनी अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. मीना गणेश यांनी त्यांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. नाटक आणि नंतर चित्रपट असा त्यांचा प्रवास आहे.

मीना गणेश यांचे चित्रपट

मीना यांनी मुजक्कम चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानंतर पुढे त्यांनी मंडनमार लोंदानिल, उत्सव मेलम, गोलंथरा वर्था, सक्षल श्रीमन चथुन्नी, कल्याण सौगंधिकम या चित्रपटात अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT