Malaika Arora Got Trolled Because of wearing Balenciaga outfit Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: मुन्नी पुन्हा झाली बदनाम, एका ड्रेसमुळे आली नेटकऱ्यांच्या कचाट्यात

मलायकाने घातलेल्या आऊटफिटवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Pooja Dange

Malaika Arora and Her Balenciaga Outfit: मलायका अरोराचा फिटनेस आणि फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो. मलायका तिच्या फॅशनने सर्वांनाच भुरळ पाडत असते. यावेळी मात्र मलायकाला तिच्या आऊटफिटमुळे प्रचंड त्रास झाला आहे. एक पार्टीमध्ये मलायकाने घातलेल्या आऊटफिटवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

मलायका अरोराने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. पार्टीमध्ये मलायका हाय फॅशन ब्रँड बॅलेंसअगाच्या आऊटफिटमध्ये तेथे गेली होती. परंतु या बॅलेंसिअगा ब्रँडच्या आऊटफिटमध्ये मलायकाला पाहून लोक तिच्यावर प्रचंड संतापले आहेत. एका जाहिरातीमध्ये 'लहान मुलांना सेक्शुअलाइज' करण्याचा आरोप बॅलेंसिअगा ब्रँडवर आहे. यामुळे मलायकाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. ब्रँडच्या अशा जाहिरातीमुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. अशातच मलायकाने या ब्रँडचे कपडे घातल्याने तिच्यावर टीकेचे झोड उठली आहे.

मनीष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीचे मलायकाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मलायका या फोटो आणि व्हिडिओमध्ये बॅलेंसिअगा ब्रँडच्या शॉर्ट शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. मलायकाने तिच्या लूकला हाय थाइ बूट्स घालून पैर केले आहे. मलायकाने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. तसेच लूक पूर्ण करण्यासाठी ब्लॅक बॅग घेतली आहे. (Birthday)

या लूकमध्ये मलायका नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे. परंतु मलायकाने लहान मुलांना सेक्शुअलाइज करणाऱ्या ब्रँडचा ड्रेस घालणे लोकांना आवडलेले नाही. चाईल्ड अब्युज प्रमोट करणाऱ्या ब्रँडला सपोर्ट करताना मलायका लाज वाटली पाहिजे होती, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, इतक्या वादानंतरही बॅलेंसिअगाचे आऊटफिट घातलं आहे, लाज बाळग. तर दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे की, बॅलेंसिगाने लहान मुलांना सेक्सुअलाइज केले आहे, असे असूनही तुम्ही त्या ब्रँडचे कपडे कसे घालू शकता. तर आणखी एका नेटकाऱ्याने म्हटले आहे की, खार सांगू का, मलायकाला या बॅलेंसिअगाच्या कपड्यांमध्ये पाहून खूप निराश झालो आहे, तिच्या डोक्यात काय सुरू आहे. (Malaika Arora)

हॉलिवूड अभिनेत्री किम कदार्शियन या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर होती. ब्रॅण्डने लहान मुलांना सेक्शुअलाइज केल्यानंतर अभिनेत्री संतापली होती आणि तिने ब्रँडसोबतचा तिचा करार रद्द केला होता.

मलायका तिच्या नवीन शो 'मूविंग इन विथ मलायका'मुले चर्चेत आहे. शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. या भागात मलायकाने तिच्या जीवनातील अनेक रहस्य उलघडली आहेत. फराह खानसोबत बोलताना मलायका भावुक सुद्धा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन तरुण अन् एक तरुणी लिफ्टमध्ये, अचानक मोठा स्फोट झाला, हादरवणारा थरार CCTV मध्ये कैद|VIDEO

Maharashtra Live News Update: म्हाडाने १२० सदनिकांची विक्री प्रक्रिया पुढे ढकलली

राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा दु:खाचा डोंगर; माजी मंत्र्यांच्या वडिलांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Chanakya Niti: या 5 चुकांमुळे पुरुष होतात उद्ध्वस्त, संसारही टिकत नाही; चाणक्यांनी काय दिला सल्ला

फूड डिलीवरीवाल्यासोबत वाद; हेल्मेट आणि लाथाबुक्क्यांनी मारलं, व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT