Malaika Arora Diet SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Diet : पन्नाशीतही चेहऱ्यावर ग्लो, फिटनेस क्वीन 'मलायका'चं सीक्रेट डाएट

Malaika Arora Fitness Tips : मलायका नेहमी तिच्या लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तिच्या या फिटनेस आणि ग्लोलिंग त्वचेचे रहस्य जाणून घ्या.

Shreya Maskar

मलायका अरोरा (Malaika Arora) बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. मलायका अरोरा तिच्या वयाच्या पन्नाशीतही अजूनच सुंदर आणि फिट दिसत असते. तिच्या या फिटनेसमुळे ती नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असते. सोशल मिडियावर तिच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तिचे हे फिटनेस डाएट सर्वच चाहत्यांना फॅालो करायचे आहे. तुम्हाला ही मलायका अरोरासारखे स्वत:ला फिट आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर तुम्ही मलायकाचे फिटनेस टिप्स फॅालो करा.

बॅालिवूड अभिनेत्री सकाळी उठल्यावर पाणी किंवा कोणत्याही डिटॉक्स ड्रिंक्सचे सेवन करत असते. त्यानंतर योगासने करून आपल्या दिवसाची सुरुवात करते. मलायका स्वत:ला अजून फिट ठेवण्यासाठी जिम करते, चालते आणि पोहते. सोशल मिडियावर नेहमी चर्चेत असलेली मलायका तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक योगा, जिमचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

मलायका इंस्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या आरोग्याच्या पदार्थाचे ही फोटो पोस्ट करत असते. मलायका तिच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी एक कप गरम पाण्यात लिंबू पिळून त्यात मध घालते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाणी कसे प्यावे याचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो मलायका अरोराच्या मते स्वत:साठी ऊर्जचा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. मलायका तिच्या सकाळच्या दिनचर्येमध्ये कधी-कधी जिऱ्याचे किंवा साधे पाणी पित असते.

मलायका नेहमीच आपल्या मुलाखतीत आपल्या फिटनेस आणि डाएट बद्दल बोलत असते. अभिनेत्री मलायकाला भारतीय संस्कृतीचे पदार्थ खायला खूप आवडतात. तिच्या सकाळी नाशत्यामध्ये ओट्स, गूळ, मध यांसारखे पदार्थ असतात. मलायकाच्या दुपारच्या जेवणामध्ये चिकन, कार्ब्स, हिरव्या भाज्या, बीन्स, भात, भाकरी किंवा चपाती यांयारख्या पदार्थांचा समावेश असतो. मलायका संध्याकाळी जिमला जाताना एक तास अगोदर पीनट बटर सँडविच खाते. मलायकाच्या रात्रीच्या जेवणाची वेळ संध्याकाळी सात वाजताची आहे. तिच्या रात्रीच्या जेवणात ती भाज्यांचे सूप आणि सॅलड यांचे सेवन करते. अभिनेत्रीच्या म्हणण्यांनुसार, रात्री जेवढे हलके जेवण कराल तेवढेच ते पचनास चांगले असते. त्यामुळे तुम्ही फिट राहू शकता. बॅलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रेटी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायामा ऐवजी आहाराकडे जास्त लक्ष देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT