Malaika-Arjun Breakup Rumors Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika-Arjun Lunch Date: मलायका अरोरा - अर्जुन कपूरचं नक्की ब्रेकअप झालाय का? लंच डेटचा VIDEO व्हायरल

Malaika Arora - Arjun Kapoor Spotted: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर स्पॉट झाले आहेत.

Pooja Dange

Malaika Arora - Arjun Kapoor Amid Breakup Rumours:

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी रविवारी लंच डेटला जात ब्रेकअपच्या अफवांना धुडकावून लावले आहे. दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना स्पॉट झाले आहेत. मलायकाने अंशुला कपूर आणि जान्हवी कपूर या बहिणींसह अर्जुनच्या कुटुंबाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर दोघांचे नाते संपले असल्याची चर्चा होत होती.

मलायका अरोरा स्टायलिश व्हाईट शर्ट आणि मॅचिंग लोफर्ससह व्हाइट शॉर्ट्स आउटफिटमध्ये होती. तर अर्जुनने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या ट्रॅक पॅंटमसह पांढरे शूज घातले होते. पापाराझींनी शेअर केलेल्या नवीन फोटो आणि व्हिडिओंमध्ये हे कपल आनंदी असल्याचे दिसत होते.

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या गोंडस व्हिडिओवर अर्जुनने शनिवारी प्रतिक्रिया दिल्याने त्यांचे पॅच-अप (कथित) झाल्याचे जगजाहीर झाले. अर्जुन मलायकाला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असून त्याने तिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना अनफॉलो केलेलं नाही.

मलायकाने तिच्या पेट डॉगचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर अर्जुनने “हँडसम बॉय” अशी कमेंट केली होती. त्याने दुसर्‍या कमेंटमध्ये लिहिले होते की, "तुझ्या आयुष्यातील खरा स्टार कॅस्पर." अनेकांनी त्यांच्या सोशल मीडियावर अशा कमेंट्स दिल्याने दोघांमध्ये सर्व ठीक आहे हे समजण्यासाठी त्यांच्या चाहत्यांसाठी हे पुरेसे होते.

मलायकाने अर्जुन आणि त्याच्या बहिणींना अनफॉलो करण्याव्यतिरिक्त, त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांची पुष्टी करणाऱ्या अनेक गोष्टी यादरम्यान घडल्या. अर्जुनचे नाव अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर कुशा कपिलाशी जोडले जात होते.

कुशा आणि तिचा पती जोरावर सिंग अहलुवालियाचा नुकताच घटस्फोट झाला आहे. कुशा कपिलने या अफवांवर मौन सोडत इन्स्टाग्रामवर याला नात्याला नकार दिला होता. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'चेंज' आणि 'सपोर्ट' बद्दल काही गूढ पोस्ट देखील शेअर केल्या होत्या.

अर्जुन आणि तिच्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टींचे कौतुक करताना, मलायका ब्राइड्स टुडेला या वर्षी एप्रिलमध्ये एका मुलाखतीत म्हणाली होती की, “मला वाटते की तो त्याच्या वयापेक्षा खूप मॅच्युर आहे आणि त्याच्याकडे खूप डीप आणि स्ट्रॉंग सोल आहे. तो खूप फ्री आणि केअरिंग आहे. मी त्याच्यासोबाबत पुढे जाऊ शकतो.

तिच्या फ्युचर प्लॅनविषयी बोलताना मलायका म्हणाली होती, "मला असे वाटते की मी सध्या माझ्या प्राईममध्ये आहे आणि मला पुढील 30 वर्षे असेच काम करायचे आहे. मला मागे हटायचे नाही; मला खूप काही शोधायचे आहे. मला प्रवास करायचा आहे आणि मला अर्जुनसोबत घर सेट करायला आवडेल आणि आमचे नाते पुढच्या लेवलवर नेले पाहिजे कारण मला वाटते की आम्ही दोघे त्यासाठी तयार आहोत.” (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT