Devmanus SAAM TV
मनोरंजन बातम्या

Devmanus: रहस्यपूर्ण, गूढ भावनांनी भरलेला कथा; लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित

Devmanus Marathi Movie : मराठी चित्रपट ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Devmanus: लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या 'देवमाणूस' या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. देवमाणूस या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर याने केले आहे.

मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्करसह कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर, लेखिका नेहा शितोळे तसेच निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीमने हजेरी लावली. हा क्षण लव फिल्म्सच्या मराठी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'देवमाणूस' रहस्यपूर्ण, गूढ कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला वाढवली असून ‘देवमाणूस’ मराठी प्रेक्षकांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणाला, “देवमाणूस चित्रपट माझ्यासाठी अत्यंत जवळचा आहे. नाट्य, भावना, आणि थरार यांचा सुरेख संगम या चित्रपटात आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी माझ्यावर विश्वास दाखवून त्यांचा पहिला मराठी चित्रपट मला दिग्दर्शित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. माझ्या संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे स्वप्न साकारलं आहे.

निर्माते लव रंजन म्हणाले, “देवमाणूस हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला मनापासून दिलेला आदर आहे. त्यातील कला, संगीत आणि कथा सांगण्याची शैली यांचा सन्मान आहे. मराठी चित्रपटसृष्टीत उंबरठा ओलांडताना, हा केवळ आरंभ नसून दर्जेदार कथा सादर करण्याचा आमचा नवा संकल्प आहे.” लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, देवमाणूस हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT