Sanjay Raut on Mahesh Kothare Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahesh Kothare: महेश कोठारे म्हणाले मी मोदी भक्त; संजय राऊतांनी उडवली खिल्ली, म्हणाले - 'तात्या विंचू रात्री येऊन...'

Sanjay Raut on Mahesh Kothare: मराठी अभिनेता महेश कोठारे यांनी ‘मी मोदी भक्त आहे’ असा दावा केला. त्यावर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी टीका केली. त्यामुळे राजकीय आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Sanjay Raut on Mahesh Kothare: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता महेश कोठारे यांनी एका कार्यक्रमात सांगितले की ते भाजपाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भक्त आहेत. त्यांनी म्हटले,“मी मोदी भक्त आहे, मुंबईत कमळ फुलवायचे आहे आणि माझं हे मत स्पष्ट आहे.”

या त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, “ महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. आपण कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिले आहेत का? अशा वक्तव्यांनी परिणाम होऊ शकतो. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा दाबेल.”

संजय राऊत यांनी कोठारेंच्या विधानाकडे राजकीय संदर्भातून लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, महेश कोठारेंचे हे वक्तव्य फक्त एकवेळचे नाही, तर याचा परिणाम मुंबई राजकारणात दिसेल. त्यांच्या या शब्दांमुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

महेश कोठारे हे मराठी सिनेसृष्टीतील एक महत्वाचे नाव असून, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ , 'धूमधडाका' यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली छाप पाडली आहे. आता त्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे त्यांचे चाहते आणि समीक्षक दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत. या घटनेने मनोरंजन आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात वाद निर्माण केला आहे. अनेकांनी संजय राऊत यांच्या शब्दांचे समर्थन केले, तर काहींनी महेश कोठारेंच्या वक्तव्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

SCROLL FOR NEXT