Sneha Wagh On Mumbai: मराठी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या अध्यात्माच्या प्रवासात पूर्णपणे रमली आहे. ‘चंद्रनखरा’, ‘बिग बॉस मराठी’, ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकांमधून प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री आता मुंबईच्या गजबजाटापेक्षा वृंदावनच्या शांततेत आपला वेळ घालवणं पसंत करते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत स्नेहानं आपल्या अध्यात्मिक प्रवासाविषयी अनेक अनुभव शेअर केले आहेत.
“मी सगळ्या देवांना डिस्टर्ब करायचे…”
स्नेहा म्हणते, “मी सगळ्या देवांना डिस्टर्ब करायचे. देवीचंही नमन करायचं, शंकराचंही नमन करायचं, विष्णूचंही नमन करायचं. बागेश्वर धाम महाराज आणि प्रेमानंद महाराज यांचे व्हिडिओ मी रोज बघायचे. सकाळी आणि रात्री माझा ठरलेला वेळ असायची सगळ्या देवांना नमन करायचं आणि मगच झोपायचं. या सगळ्यामुळे मला देवांशी बोलायची सवय लागली. दिवसात काय झालं, ते रात्री देवांना सांगायचं. काही चुकीचं झालं की मला देवावरच राग यायचा.”
मला वृंदावनचं आमंत्रण मिळालं...”
स्नेहा सांगते, “मला असं वाटतं की माझं ते भक्तीमय वागणं मॅनिफेस्टेशन झालं आणि मला वृंदावनचं आमंत्रण मिळालं. मी तिथे गेले आणि तीन दिवसांत माझ्यासोबत इतक्या गोष्टी घडल्या की परतल्यावर मला मुंबई आपली वाटली नाही. माझं घर, माझा बेड, काहीच आपलं वाटत नव्हतं. मी सकाळी पाचला उठायचे आणि मनात वाटायचं — मी चुकीच्या जागी आहे, मला वृंदावनला जायचं आहे.”
“मुंबईत राहणं अवघड झालं...”
ती पुढे म्हणते, “वृंदावनला सकाळी पाच वाजता मंगल आरती असते. मी मुंबईत उठून फोनवर चेक करायचे की कुठे आरती दिसते का. पण मला नाहीच जमलं इथे राहणं. पंधरा-वीस दिवस मी कसेबसे काढले आणि मग मम्मीला सांगितलं तिथे प्रागट्य महोत्सव होतोय, मी जाते. मम्मीला वाटलं आठवड्यात परत येईल, पण मी तीन महिने आलेच नाही. कारण मला मुंबईत राहणं अवघड झालं होतं”
“हेच माझं आयुष्य आहे...”
वृंदावनातील त्या दिवसांबद्दल स्नेहा म्हणते,“मी तिथे गेले आणि जी रमले, तेव्हा मला वाटलं की बस! हेच माझं आयुष्य आहे. हीच माझी दुनिया आहे, आणि हेच सगळं काही आहे.” स्नेहा वाघच्या या प्रामाणिक कबुलीमुळे तिच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री आता मुंबईपेक्षा वृंदावनमध्ये अध्यात्मात रमणं पसंत करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.