Maharashtrachi Hasyajatra New Season Start At 14 August Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasyajatra New Season: महाराष्ट्र पुन्हा खळखळून हसणार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील कलाकार हसविण्यासाठी सज्ज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtrachi Hasyajatra New Season Start At 14 August: प्रत्येक मराठी रसिकांच्या आयुष्यात हास्याचे क्षण पेरण्याचे काम ज्या कार्यक्रमाने केले तो म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. 'महाराष्ट्राच्या टेंशन वरची मात्रा म्हणजे हास्यजत्रा' असे म्हणत या विनोदी कार्यक्रमाने समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले. विशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनी आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या दोघांची सुरूवात एकाच दिवशी झाली आहे.

सोनी मराठीवरील या तूफान लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपला मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. कोविड काळात तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या टेंशन वरची मात्रा ठरली. त्यावेळी सगळीकडे निराशेचे काळे ढग दाटले असताना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा रसिकांच्या मनात आनंदाची किनार घेऊन येत होता. (Serial)

महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा अन् कुटूंबयासोबत बसून पाहण्याचा फॅमिली शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत करायला.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाला तब्बल पाच वर्ष पूर्ण झाले असून आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला हास्यजत्राच्या विनोदावीरांची टीम सज्ज झाली आहे. अन् ते देखील कॉमेडीचा फॅमिली पॅक घेवून. दिवसभरातील संपूर्ण टेंशन विसरून रात्री प्रत्येक कुटूंबाला एकत्र बसून आनंदाचे क्षण मिळवून देण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मग आता कुटुंबासोबत खळखळून हसायला तयार व्हा कारण पुन्हा येतेय तुमची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! १४ ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर. (Drama)

कॉमेडीचा बाज, अचूक टायमिंग आणि वन टेकमध्ये विनोदवीरांनी साकारलेल्या हास्याच्या या जादूला प्रेक्षकांनी यापूर्वीच डोक्यावर घेतले आहे. यातील फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखा, लॉली असो किंवा शंकऱ्या - शितलीची लव्ह स्टोरी यातील सगळीच पात्र लोकप्रिय झाली आहेत.

अभिनेता गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, दत्तू मोरे, अभिनेत्री वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांना या हास्यजत्रेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. याचे सगळे श्रेय जाते ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक, दिग्दर्शक, निर्माते असलेल्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना. त्यांच्या बहारदार लेखणीतून उतरलेले विनोद आणि मार्मिक भाष्याने नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

दर दिवशी नव्या जोमाने केलेले भन्नाट विनोदी स्कीट, सद्यस्थितीवर केलेले तिरकस भाष्य आणि परीक्षकांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांवर केलेले विनोद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये ठरले. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे खुमासदार सूत्रसंचालन, अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचे परीक्षण यासर्व गोष्टी प्रेक्षकांना भावणाऱ्या आहेत.

या अतरंगी कलाकारांसोबत महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला एकत्र जोडण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! येत्या १४ ऑगस्टपासून प्रेक्षकांचे पुन्हा एकदा निखळ मनोरंजन होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT