Vanita Kharat Birthday Celebrations Post Instagram
मनोरंजन बातम्या

Vanita Kharat Birthday Post: हास्यजत्राफेम वनिता खरातने लिहिली स्वत:साठीच पोस्ट, म्हणाली “स्वतःसाठी काही…”

Vanita Kharat Birthday News: वनिता खरात कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच वनिता खरातने तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Vanita Kharat Birthday Celebrations Post

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी टेलिव्हिजन शो प्रमाणे शोमधले कलाकारही कायमच चर्चेत असतात. अनेक कलाकारांना या शोने एक वेगळीच ओळख दिली आहे. आपल्या कॉमेडीमुळे शोमधले सर्वच कलाकार महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे, वनिता खरात. वनिता खरात कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच वनिता खरातने तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

कायमच आपल्या विनोदामुळे आणि काही पात्रांमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या वनिताने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर वनिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वनिताने अमेरिका, कॅनडा आणि भारतामध्ये तिचा वाढदिवस कसा साजरा केला याची झलक दाखवली. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वनिता खरात आपल्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणते, “या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता, कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये अमेरिका, कॅनडा आणि भारत... तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं.” (Actress)

वनिता खरात आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमित ने माझा हात धरला! इतके प्रचंड देश पाहताना, तिथलं सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमितची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमित ने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्यापर्यंत पोचावल्या.”

पोस्टच्या शेवटच्या भागात वनिता खरात म्हणते, “या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून. ता. क. - पुढच्या वाढदिवसाला बघुया कुठल्या देशात असेन! शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर I love you का ते तुम्हाला माहित आहे.”

वनिता खरातबद्दल बोलायचे तर, तिचा १९ जुलै रोजी वाढदिवस असतो. तिच्या वाढदिवसानिमित्त हास्यजत्रेतल्या अनेक कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने तिचा वाढदिवस फक्त अमेरिकेतच नाही तर भारतातदेखील तिचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूटमुळे कमालीची चर्चेत आली होती. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि कबीर सिंगमधील मोलकरणीच्या भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

SCROLL FOR NEXT