सनी देओलच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. तांत्रिक कारणांमुळे बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
सनी देओलने बँकेकडून खूप मोठ्या रक्कमेचे कर्ज घेतले होते. ५६ कोटींचे हे कर्ज आहे. जे सनी देओलने अद्याप फेडलेले नाही.
काय आहे सनी देओलचे लोन प्रकरण?
बँक ऑफ बडोदाने सनी देओलचा व्हिला लिलाव करण्याची जाहिरात काढली होती. सनी देओलने बँकेकडून खूप कर्ज घेतले होते. हे कर्ज घेण्यासाठी सनी देओलने त्याचा मुंबईतील 'सनी व्हिला' गहाण ठेवला होता. आता सनी देओलला ५६ करोड रुपयांची परतफेड करायची होती. ज्यापैकी त्याने अजूनपर्यंत कोणतीही रक्कम फेडलेली नाही.
हे कर्ज आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी बँकेने प्रॉपर्टीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात असे म्हटले आहे की, 'सनी व्हिला' २५ सप्टेंबरला लिलावात काढण्यात येणार आहे. या प्रॉपर्टीची रिजर्व प्राईज ५१.४३ करोड रुपये ठेवण्यात आली होती.
राजकीय प्रतिक्रिया
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चित्रपट अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या घराच्या ई-लिलावावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर त्यांनी ट्विट केले आहे की, काल देशाला कळले की त्यांच्या घराचा लिलाव होणार आहे आणि २४ तासांच्या आत बँकेने लिलावाची नोटीसही मागे घेतली.
जयराम रमेश यांनी ट्विट करत लिहिले आहे, “काल दुपारी, देशाला कळले की बँक ऑफ बडोदाने भाजप खासदार सनी देओलचे जुहू येथील निवासस्थान ई-लिलावासाठी काढला आहे. कारण त्यांनी बँकेला 56 कोटी रुपये परत केले नाहीत. आज सकाळी, 24 तासांपेक्षा कमी कालावधीत, बँक ऑफ बडोदाने 'तांत्रिक कारणांमुळे' लिलावाची नोटीस मागे घेतल्याचे समजले. या 'तांत्रिक कारणांचे' मागचे कारण कोण आहे, याचे आश्चर्य वाटते? (Latest Entertainment News)
तर दुसरीकडे सनी देओलच्या चित्रपट भारतात धुमाकूळ घालत आहे. ३७७.२० कोटींची कमाई आतापर्यंत या चित्रपटाने केली आहे. लवकरच हा चित्रपट ४०० कोटींच्या घरात जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.