Prithvik Pratak New House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Birthday :हास्य जत्रेत 'किंग खान'चा जबरा फॅन, शाहरुखच्या वाढदिवशी नवीन घरात केली एन्ट्री

Prithvik Pratak New House : शाहरुखच्या वाढदिवशीच एका अभिनेत्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prithvik Pratap Buy New House On Shah Rukh Birthday :

बॉलिवूडच्या किंग खानने गुरुवारी आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारदेखील शाहरुखचे खूप मोठे फॅन आहेत. शाहरुखच्या वाढदिवशीच एका अभिनेत्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सोशल मीडियावरुन त्याने ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप हा शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. तो नेहमी त्याच्या अभिनयातून शाहरुख खानसारखा लूक, त्याच्यासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने शाहरुखच्या वाढदिवसाचे निमत्त साधत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. पृथ्वीकनं शाहरुखच्या वाढदिवशी मुंबईत खरेदी केलेल्या आपल्या नवीन घरात प्रवेश केला.

अभिनेता पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. पृथ्वीकने त्याच्या नवीन घराबाहेरील फोटो शेअर करत 'आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा पण एक स्वप्न जे आज पर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं…आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहा च छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं…

आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारख वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरु राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…!गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबर ला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढ दिवशी त्यामुळे माझी ‘मन्नत’ पुरी झाली अस म्हणायला हरकत नाही. हे घर मिळण्यासाठी अनेकांची निस्वार्थ मदत झाली… त्या प्रेत्यकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन'. असं कॅप्शन दिले आहे.

पृथ्वीकने याआधी शाहरुखसारख्या अनेक गोष्टी केल्या आहे. जवान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखचा टक्कल लूक हुबेहुब साकारला होता. त्याचसोबत त्याने बेकरार करके हम आणि जवान चित्रपटातील चलेया गाण्यावरदेखील जबरदस्त डान्स केला होता.

पृथ्वीकच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसबोतच अनेक कलाकारांनीदेखील पृथ्वीकचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT