Famous Actor Accident saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या दुचाकीचा भीषण अपघात; शस्त्रक्रियाही झाली, स्वतः सांगितला दुर्घटनेचा थरार

Marathi Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अभिनेत्याने स्वतः दुर्घटनेचा थरार सांगितला आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.

अपघातात अभिनेता गंभीर जखमी झाला.

अभिनेत्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता विराज जगताप याचा भीषण अपघात झाला. आजवर विराज जगतापने आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांना हसवले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. विराजच्या अपघातानंतर त्याचे चाहते चिंतत पडले आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

विराजने स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, विराज जगताप कारच्या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. बदलापूर पूर्व येथे आदर्श विद्या मंदिराजवळ ही घटना रात्री १० च्या सुमारास घडली. २४ मार्चला अभिनेत्याचा अपघात झाला. अपघातात विराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या मनगटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विराज २४ तारखेला मित्राकडे गेला होता, तेथून रात्री दुचाकीवरून तो घरी येत होता, तेव्हा आदर्श विद्या मंदिराजवळील एका मोठ्या स्पीड ब्रेकरचा त्याला अंदाज आला नाही आणि अपघात घडला. स्पीड ब्रेकरवर कोणतेही पांढरे पट्टे नव्हते, ज्यामुळे विराजला स्पीड ब्रेकर दिसून आला नाही.

विराजने गाडीचा वेग कमी केला मात्र शेवटी गाडी घसरली. या अपघातात अभिनेता गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताच्या मनगटाला आणि पायाला गंभीर इजा झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यांनी त्याच्या मनगटावर शस्त्रक्रिया झाली. या घटनेनंतर अभिनेत्याचे चाहते आणि तेथील नागरिकांनी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. स्पीड ब्रेकरचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडे निधी नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे का नाही? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. शासनाच्या नियमानुसार स्पीड ब्रेकरची उंची, आकार आणि त्यावर रात्रीच्या वेळी चमकणारे पांढरे पट्टे असणे बंधनकारक आहे.

विराज हा अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. त्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. अलिकडेच त्याचा 'रुबाब' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी गर्लफ्रेंडसोबत खटके उडाले, नंतर इन्स्टाग्रामवरून धमक्या आल्या अन्... कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवड मेट्रोच्या कामाचा निष्काळजीपणा, मेट्रो ब्रीजवरील पत्रा पडल्याने नागरिकांचा जीव थोडक्यात बचावला

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमन पोलिसांच्या ताब्यात

पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग, राज्य सरकारने १२०० कोटींच्या प्रकल्पाला दिली मंजुरी, कुठून जाणार हायवे?

SCROLL FOR NEXT