Gaurav More Meet Murlidhar Mohol Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav More News : गौरव मोरेने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट, भेटीचं नेमकं कारण काय ?

Gaurav More Meet Murlidhar Mohol : गौरवने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यानचे गौरवने फोटो शेअर केले आहेत सध्या त्यांच्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

आपल्या दमदार अभिनयाच्या आणि कॉमेडीच्या जोरावर अभिनेता गौरव मोरे याने आपला विशेष चाहतावर्ग तयार केलेला आहे. गौरवचा विशेष इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोईंग आहे. हास्यजत्रेला सोडचिठ्ठी देत गौरवने ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमध्ये एन्ट्री मारली आहे. नुकतंच गौरवने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यानचे त्याने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

यावेळी अभिनेत्याने खासदार मुरलीधर मोहोळ यांना खास त्यांची फोटोफ्रेम गिफ्ट म्हणून दिली. गौरवने मुरलीधर मोहोळ यांना त्यांचा विजयी झाल्यानंतरचा फोटो त्यांना गिफ्ट दिला आहे. शेअर केलेल्या फोटोला अभिनेत्याने “माननीय खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री यांची सदिच्छा भेट” असं कॅप्शन दिलं आहे. सध्या गौरवचा हा फोटो इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून अनेक चाहते त्याचे कौतुक करीत आहेत.

खासदार मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष, पुण्याचे महापौर सारखे पद सांभाळले आहेत. मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच खासदार झाले असून त्यांची पहिल्याच वर्षी मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात झालेल्या या लढतीत मोहोळ यांनी तब्बल 1 लाख 23 हजार मतांनी धंगेकरांचा पराभव केला. अत्यंत प्रतिष्ठेचं असलेल्या पुण्याचं मैदान मारल्यामुळे पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली.

गौरव मोरेचा नुकताच ‘अल्याड पल्याड’ चित्रपट रिलीज झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच गौरवने ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता गौरव ‘मॅडनेस मचायेंगे’च्या माध्यमातून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT