३१ ऑगस्टपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदच

उड्डाणांवरील बंदीमुळे विमान वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
३१ ऑगस्टपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदच
३१ ऑगस्टपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदच Saam tv news

जगभरातील अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोना विषाणूचा (Corona virus) कहर कायम आहे. त्यामुळे परदेशांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्रसरकारने आंतरराष्ट्रीय उड्ड्णांवर (International flights) बंदी ३१ ऑगस्टपर्यंत (31 August) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालया ( DCGA) ने हा निर्णय घेतला आहे. (International flights closed till August 31)

मात्र नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ( DCGA) परवानगीने चालणाऱ्या मालवाहू विमान आणि विशेष उड्डाणांसाठी ही बंदी असणार नाही. पण आवश्यकता असल्यास, सक्षम प्रशासनाद्वारे काही निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमानुसार सुरू राहील. विशेष म्हणजे, इतर देशांमध्ये अडकलेल्या लोकांना भारतात आणण्यासाठी किंवा परदेशी नागरिकांना भारतातून नेण्यासाठी खास उड्डाणे नियमितपणे चालविली जात आहेत.

३१ ऑगस्टपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदच
महापौराची गोळ्या झाडून हत्या; हत्येमागे BJP आमदाराचं कनेक्शन?

यापूर्वी ही बंदी 31 जुलैपर्यंत लागू करण्यात आली होती, जी शनिवारीच संपत होती. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे पाहता सरकारने ही बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. मागील वर्षी लॉकडाउन लागू करण्यात आल्याने भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांची हालचाल थांबविण्यात आली होती. त्यानंतर सरकारने अनेक वेळा फ्लाइट्सवर बंदी घातली आहे.

- आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी हवाई करार (Air Bubble Agreement)

भारताने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी हवाई करार म्हणजेच एअर बबल करार केले आहेत. ज्यात अमेरिका, ब्रिटन, केनिया, भूतान, नायजेरिया, मालदीव, कॅनडा, युएई, कतार, जपान, इराक, जर्मनी यांसह अनेक देशांचा समावेश आहे.

विमान क्षेत्राला कोरोनाचा फटका

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडं मात्र लक्ष लागले आहे. दरम्यान देशांतर्गत विशेष खबरदारी घेऊन, देशांतर्गत क्षेत्रात उड्डाणे चालविली जात आहेत. उड्डाणांवरील बंदीमुळे विमान वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. विमान कंपन्यांची स्थिती बिकट असून गेल्या वर्षभरात कंपन्याना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

या क्षेत्रातही टाळेबंदीचा मोठा प्रभाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. बर्‍याच लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका आहवालानुसार इंडिगो विमान कंपनीला आतापर्यंतचा सर्वात मोठा तिमाही तोटा सहन करावा लागला आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com