कटिहार : बिहार Bihar राज्यामधील कटिहार Katihar येथील महापौर शिवराज पासवान ऊर्फ शिवा पासवान यांची गुरुवारी सायंकाळी काही अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या Murder केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी Police तातडीने तपासाची चक्र फिरवत ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. महापौर पासवान यांच्या हत्या प्रकरणामध्ये एका BJP आमदाराच्या नातेवाईकाचे नाव समोर आले आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली आहे, याची माहिती अद्याप देखील समोर आली नाही.
हे देखील पहा-
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. BJP आमदार कविता पासवान यांच्या भाच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ८ आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जमीन खरेदी- विक्रीच्या वादामधून महापौर शिवराज पासवान यांची हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच अनुषंगाने पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुढील ४८ तासांत हत्येचा खुलासा केला जाणार आहे. अटक Arrested केलेले सर्व आरोपी कटिहार शहराच्या जवळपासच्या परिसरात मधील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. बिहार राज्यामधील कटिहार येथील महापौर शिवराज पासवान ऊर्फ शिवा पासवान यांची गुरुवारी सायंकाळी काही अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
मृत पासवान हे गुरुवारी सायंकाळी काम उरकून, दुचाकीने आपल्या घरी जात होते. दरम्यान, वाटे मध्ये निर्मनुष्य ठिकाणी काही अज्ञात आरोपी त्यांची वाट बघत बसले होते. पासवान संतोषी चौक रेल्वे गेट परिसरामध्ये येताच आरोपींनी त्यांच्यावर ताबडतोब हल्ला चढविला आहे. हल्लेखोरांनी पासवान यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये त्यांना ३ गोळ्या पासवान यांच्या छातीत मध्ये लागले आहे.
गंभीररित्या जखमी झालेल्या पासवान यांना रात्री उशीरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली गेली. यामुळे नातेवाईकांसह समर्थकांनी मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ३ हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या समोर आली आहे. या हत्याकांडात बीजेपी आमदार कविता पासवान यांच्या भाचाचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.