Prajakta Mali Jamal Kudu Dance Instagram
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Jamal Kudu Dance: 'बॉबी देओल आणि डॉन...'; ३१ डिसेंबरच्या रात्री प्राजक्ताचा कुटुंबासोबत ‘जमाल कुडू’वर भन्नाट डान्स

Prajakta Mali Viral Dance Video: हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळीनेही नुकतंच ३१ डिसेंबरच्या रात्री कुटुंबासोबत ‘जमाल कुडू’वर भन्नाट डान्स केला होता. सध्या सोशल मीडियावर त्या व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Prajakta Mali Jamal Kudu Dance

‘ॲनिमल’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान चर्चा होताना दिसते. चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील गाण्याचीही सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ गाण्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे.

फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनीही त्या गाण्यावर ठेका धरला आहे. सध्या सोशल मीडियावर मायरा वायकूळ हिच्या व्हिडीओची चर्चा होत असताना, आता हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी हिच्या डान्सची सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. (Marathi Actress)

काही तासांपूर्वीच प्राजक्ताने ‘जमाल कुडू’ गाण्यावर एक इन्स्टाग्राम रिल शेअर केला आहे. तिच्यासोबत या गाण्यावर तिच्या कुटुंबीयांनीही खूप सुंदर डान्स केलेला दिसतोय. प्राजक्ताने न्यू इयर सेलिब्रेशनच्या दरम्यानचा हा व्हिडीओ शेअर करताना, "About 31st December… आमचे बॅाबी देओल आणि डॉन… २०२३ ची लास्टची सेल्फी आणि २०२४ ची पहिली सेल्फी... २०२४ या वर्षातली पहिली पोस्ट, नवीन वर्षाच्या शुभेच्छा" असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Viral Video)

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे नातेवाईक आणि ती ‘जमाल कुडू’ आणि ‘डॉन’ गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. तिच्या कुटु्ंबीयांनी बॉबी देओल सारख्याच हूक स्टेप करताना दिसत आहे. त्यासोबतच प्राजक्ता या व्हिडीओच्या शेवटच्या भागात चुलीवर भाकर बनवताना दिसते. (Marathi Film)

सध्या प्राजक्ताचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिच्या साधेपणाचे खूप कौतुक केले. या व्हिडीओवर नेटकरी म्हणतात, "सारं काही बाजूला ठेवून, सर्वांच्यात मिसळते म्हणून तर 'प्राजक्ता'नव्याने कळते", "साधी रहाणी, उच्च विचारसरणी, खूप छान... स्पेशली चुलीवरच्या भाकरी" अशी कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या साधेपणाचे कौतुक करीत आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, काही सेलिब्रिटी मित्रांनीही व्हिडीओवर लाईक्स केल्या आहेत. (Social Media)

प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचे तर, गेल्या काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यासोबतच प्राजक्ता 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा'ची होस्ट म्हणून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

SCROLL FOR NEXT