Mangala Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mangala Movie: गायिकेवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची थरारक कहाणी! 'मंगला' चित्रपटातून 'या' दिवशी येणार समोर

Manasvi Choudhary

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातुन घराघरांत पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता शिवाली मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. हो कारण मुख्य भूमिकेत असलेल्या शिवालीचा 'मंगला' हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत होती. आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन 'मंगला' हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२५ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच चित्रपटाची तारिख समोर आली आहे.

सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास शिवालीमार्फत मंगला या चित्रपटातून १० जानेवारी २०२५ ला समोर येईल. नुकतीच निर्मात्यांनी चित्रपटाची तारिख घोषित केली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून या हल्ल्याची प्रचिती ही येतच आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर शिवाली मंगला या भूमिकेत असून तिच्या चेहऱ्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याची खूण पाहायला मिळत आहे. हे चित्र पाहण्याजोगं नसलं तरी या मागील गहन विषय साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंका नाही.

'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा १० जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

Bombay Vada pav : मुंबईच्या वडापावचं टोपण नाव माहितीये का?

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

SCROLL FOR NEXT