Pruthvik Bhalerao Play Female Character Instagram
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’मध्ये पाहायला मिळणार मॉडर्न देवयानी; नेमकी आहे तरी कोण?

Maharashtrachi Hasyajatra Latest Episode: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील सर्वच कलाकार आपल्या हटक्या भूमिकांसाठी ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर या शोमधील एका कलाकाराच्या स्त्री वेशाने सर्वांचेच लक्ष वेधले.

Chetan Bodke

Pruthvik Bhalerao Play Female Character

कलाकार म्हटलं की, कोणताही रोल असो तो अगदी व्यवस्थित रित्या कसा पार पडेल. याकडे प्रत्येकजण लक्ष देतो. कोणतीही भूमिका साकारण्यासाठी अनेक कलाकार स्वत:ला पूर्णपणे बदलत असतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील सर्वच कलाकार आपल्या हटक्या भूमिकांसाठी ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर या शोमधील एका कलाकाराच्या स्त्री वेशाने सर्वांचेच लक्ष वेधले. त्या अभिनेत्याने अनेकदा या शोमध्ये स्त्री पात्र साकारले आहे. नेमका हा अभिनेता कोण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

आपल्या हटक्या कॉमेडीने अभिनेत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हा दुसरा तिसरा कोणीही नसून अभिनेता पृथ्वीक भालेराव आहे. पृथ्वीकला हास्यजत्रेतून महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याने आपल्या कॉमेडीच्या जोरावर आणि वेगवेगळ्या भूमिकेच्या जोरावर सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अभिनेत्याने अवघ्या काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर त्याच्या स्त्री भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे. ‘देवयानी’ हे पात्र साकारताना हा लूक त्याने केला होता.

पृथ्वीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना, “देवयानी, पसंत आहे मुलगी?” असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. स्त्री वेशातील हा फॅन्सी लूक सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड चर्चेत आला आहे. इयर रिंग्ज, गळ्यात लॉकेट, स्मोकी डार्क रेड लिपस्टिक आणि स्काय ब्लू साडी वेअर करत त्याने हा फोटोशूट केले आहे. अभिनेत्याच्या ह्या लूकवर फक्त चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडून ही त्याचे कौतुक करत आहे.

पृथ्वीकच्या ह्या फोटोवर प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, अक्षया नाईक, तन्वी बर्वे, धैर्य घोलपसह अनेक कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया देत त्याच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. अभिनेत्याचा हा स्त्री वेशातला लूक पाहून “आयला घाबरलो ना, छातीत धडकीच भरली”, “आग… मरतो का काय मी”, “बाबो लय खतरनाक एकदम”, “निखळ सौंदर्य”, “मस्त भाई”, अशा अनेक प्रतिक्रिया पृथ्वीकला चाहत्यांनी दिल्या आहेत.

पृथ्वीक प्रतापच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटात पृथ्वीकने प्रथमेश परबसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील पृथ्वीकची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली. त्यासोबतच त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधूनही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून आणखी ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद, तुमचं नाव नाही ना?

Manikrao Kokate : रोहित पवारांनी आणखी एक पत्ता काढला, कृषीमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

SCROLL FOR NEXT