अभिनंदन! Varun Dhawan होणार बाबा, पत्नी नताशासोबतचा क्युट फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

Vavrun Dhawan And Natasha Dalal: आई-बाबा होणार असल्यामुळे वरुण आणि नताशा खूपच आनंदी आहेत. वरुण धवनने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Vavrun Dhawan And Natasha Dalal:
Vavrun Dhawan And Natasha Dalal: Saam Tv

Vavrun Dhawan And Natasha Dalal Become Parents:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवनच्या (Varun Dhawan) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वरुण धवनच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. वरुण धवनची पत्नी नताशा दलाल लवकरच आई होणार आहे. आई-बाबा होणार असल्यामुळे वरुण आणि नताशा खूपच आनंदी आहेत. वरुण धवनने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

नुकताच वरुण धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी नताशासोबतचा क्युट फोटो शेअर करत बाबा होणार असल्याची गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. वरुण धवन या फोटोमध्ये पत्नीच्या बेबीबंपला किस करताना दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाइट असलेला वरुण-नताशाचा हा फोटो खूपच सुंदर आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्ही प्रेग्नेंट आहोत, 'तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे.' त्याचसोबत या पोस्टमध्ये त्याने हॅशटॅग माझी फॅमली माझी शक्ती असे देखील लिहिले आहे.

वरुण धवनच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. अवघ्या अर्धा तासामध्ये त्याच्या या पोस्टला दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्याचसोबत त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत वरुण आणि नताशावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याचसोबत अनन्या पांडे, मलायका अरोरा, सोनम कपूर, विकी कौशल, वाणी कपूर, जान्हवी कपूर, मौनी रॉय, मृणाल ठाकूर, पूजा हेगडे या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील वरुणची पोस्ट लाइक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Vavrun Dhawan And Natasha Dalal:
WWE स्टार जॉन सीना निघाला Shah Rukh Khan चा फॅन, 'भोली सी सूरत' हे सुपरहिट गाणं गायलं; VIDEO व्हायरल

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी 'भेडिया' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन 'बिग बॉस 16'च्या सेटवर पोहोचला होता. तेव्हा सलमानने थेट वरुणच्या हातात एक सॉफ्ट टॉय दिलं. त्यावर वरुणने विचारलं, 'याचं मी काय करू?' सलमान लगेच म्हणाला होता की, 'हे तुझ्या बाळासाठी आहे.' सलमानच्या तोंडून हे ऐकताच वरुण लाजला होता. 'बाळ अजून आलं नाही.' त्यावर सलमान म्हणाला होता की, 'हे आलंय तर बाळसुद्धा लवकरच येईल.' सलमानच्या या हिंटमुळेच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती की वरुण धवन बाबा होणार आहे. सलमान खानचे बोलणं आता खरं ठरलं आहे. वरुण धवन आता बाबा होणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूपच खूश झाले आहेत.

Vavrun Dhawan And Natasha Dalal:
Riteish Deshmukh: रितेश देशमुखला मिळाला महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक पुरस्कार, 'या' व्यक्तीमुळे मिळाला सन्मान; म्हणाला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com