Gaurav More Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav More Home : फिल्टरपाड्याच्या 'बच्चन'ला हवंय म्हाडाचे घर, गौरव मोरेने केला पवाईच्या घरासाठी अर्ज!

Maharashtrachi Hasya Jatra Gaurav More: सर्वसामान्यप्रमाणे सेलिब्रिटींदेखील म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असतात. अशातच मनोरंजनविश्वातील सेलिब्रिटींनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर केले आहेत.

Manasvi Choudhary

मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण व्हावे अशी प्रत्येकांची इच्छा असते. सर्वसामान्यप्रमाणे सेलिब्रिटींदेखील म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असतात. अशातच मनोरंजनविश्वातील सेलिब्रिटींनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख असलेला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे देखील अर्ज केला आहे. यासह अनेक सेलिब्रिटींनी देखील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केले आहेत.

म्हाडाच्या नियमानुसार कलाकारांसाठी काही घरे राखीव असतात. यामुळे या प्रवर्गासाठी अनेक सेलिब्रिटी मोठ्या संख्येने अर्ज सादर करतात. आतापर्यंत म्हाडाने अनेक कलाकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहेत. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार गौरव मोरेप्रमाणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' म्हणून घराघरात पोहोचलेल्या निखिल बने याने पहाडी गोरेगाव आणि कन्नमवार नगर येथील घरांसाठी अर्ज भरले आहेत.

देवमाणूस, तू चाल पुढं फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि पुन्हा कर्तव्य आहे फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकर ह्या पहाडी गोरेगाव येथील घरासाठी इच्छुक आहेत. किशोरी विज, सीमा देशमुख, निपुण धर्माधिकारी, गौतमी देशपांडे यांनी उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेने मुंबईच्या पवईत घरासाठी अर्ज केला आहे. येत्या ८ ऑक्टोबरला यशवंतराव चव्हाण सेंटरला घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यावेळी कोणत्या कलाकाराचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT