Shivali Parab SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shivali Parab : 'महाराष्ट्राची फुलपाखरू...'; मोकळे केस अन् हिरवी साडी, कल्याणच्या चुलबुलीचं सौंदर्य पाहून काळजाचं होईल पाणी पाणी

Shivali Parab Photos In Saree : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकतेच साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shreya Maskar

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परबचा (Shivali Parab) मोठा चाहता वर्ग आहे. तिला सर्वजण कल्याणच्या चुलबुली या नावाने ओळखतात. तिने आपल्या कॉमेडीने जगाला हसवले आहे. शिवाली परब एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. तिने आपल्या अभिनयाचे चाहत्यांना वेड लावले आहे. ती कोणतीही भूमिका खूप सुंदर रित्या पार पाडते. नुकतेच तिने इन्स्टाग्राम आपल्या नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत.

शिवालीचा लूक

कल्याणच्या चुलबुलीने शिवाली परबने नुकतेच साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ती या पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. शिवालीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे आणि पांढऱ्या रंगाचा स्टायशिल ब्लाऊज परिधान केला आहे. शिवालीच्या साडीवर पांढऱ्या रंगाच्या फुलांची छान नक्षी पाहायला मिळत आहे. तिने हा लूक सिल्व्हर ज्वेलरी घालून पूर्ण केला आहे. शिवालीने गळ्यात सिल्व्हर रंगाचा नेकपीस आणि मोठे कानातले घातले आहे. तर हातात हिरव्या आणि सिल्व्हर रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.

चाहत्यांच्या कमेंट्स

मोकळ्या केसांमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंमधील कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. शिवालीने खूपच मिलिमल मेकअप केला आहे. तिने या फोटोंना खूप हटके कॅप्शनं दिले आहे. शिवाली परबने लिहिलं की, "Green flag" कमेंट्समध्ये चाहते शिवालीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे. एका युजरने लिहिलं की, "महाराष्ट्राची फुलपाखरू..." तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "अति कोमल व सुंदर शिवा...किप इट अप" तसेच शिवा द ग्रेट, खूप सुंदर दिसत आहेस, मराठमोळी मुलगी अशा कमेंट्स येत आहेत.

शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. चाहते देखील शिवालीला भरभरून प्रेम करतात. सध्या प्रेक्षक शिवालीच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिने आपल्या अभिनय आणि कॉमेडीच्या बळावर यश संपादन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT