Prabhakar More SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prabhakar More : प्रभाकर मोरेला पहिल्या चित्रपटासाठी किती पैसे मिळाले? वाचा किस्सा

Prabhakar More First Movie Payment : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांना पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले आणि त्यांचा पहिला चित्रपट कोणता जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अभिनेता प्रभाकर मोरे यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून खूप प्रसिद्धी मिळाली.

प्रभाकर मोरे यांचा 'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.

'लास्ट स्टॉप खांदा' ही लव्ह स्टोरी आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेले अभिनेते म्हणजे प्रभाकर मोरे (Prabhakar More) त्यांनी आजवर अनेक चित्रपटात, नाटकात काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत प्रभाकर मोरे यांनी पहिला चित्रपट कसा घडला आणि किती मानधन मिळाले याबद्दल सांगितले आहे.

MHJ Unplugged च्या मुलाखतीत प्रभाकर मोरे यांना विचारण्यात आले की, पहिला चित्रपट कसा घडला? तेव्हा अभिनेत्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "पहिल्या चित्रपटावेळी मी नोकरी करत होतो. तीन हजार रुपये पगार होता. ती एक कसरत होती. साडे पाच ते दीड ड्युटी आणि मग नाटक. मी तेव्हा 'माझी बायको माझी मेहुणी' हे नाटक करत होतो. त्याचा पुण्यात प्रयोग होता. एक पुण्याचे दिग्दर्शक नाटक पाहायला आले होते. त्यांनी नाटक पाहिले त्यांना माझा अभिनय खूप आवडला. इंटरवलमध्ये माझ्याकडे आले माझे नाव विचारले... मग मी नाव सांगितलं. नाटकात काम करतो सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, मी एक सिनेमा करत आहे. किशोरी ताईला भेटायला आलो आहे. तु चित्रपटात काम करशील का? मी लगेच हो म्हणालो... "

प्रभाकर मोरे पुढे म्हणाले, "दादरमध्ये चित्रपटाची एक मीटिंग झाली. ते म्हणाले, मंगेश देसाई हिरो आहे. चेतन दळवी आहे. पराग आणि तू असे चार मित्र आहेत. 15 दिवसांचे काम आहे. तुला 15 हजार रुपये देईन. साताऱ्याला शूटिंग असेल. तेव्हा शेठला म्हणालो मला 15 दिवस सूट्टी हवी आहे. मी चित्रपटात काम करतोय. तेव्हा शेठ म्हणाला, तुला 15 दिवस सुट्टी दिली तर मला दुकान बंद कराव लागेल. मग मी काही दिवस अस्वस्थ होतो. तेव्हा बायको म्हणाली, काय झालं? मी तुला सर्व सांगितलं तेव्हा ती म्हणाली, नोकरी सोड... हा 15 हजार रुपये पगार आहे. तो पाच महिन्यांचा आहे. यात पाच महिन्याचे घरभाडे, रेशन भरू...जे पैसे उरतील ते ठेवू...पाच महिने तू अभिनय क्षेत्रात काम शोध... तुला काही नाही मिळाले तर नोकरी बघ..."

नुकताच प्रभाकर मोरे यांचा 'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपट रिलीज झाला आहे. 21 नोव्हेंबरला सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. ही एक प्रेमकथा आहे. चाहते प्रभाकर मोरे यांच्या अभिनयाचे, स्टाइलचे दिवाने आहेत. प्रत्येक भूमिका ते उत्तमरित्या पार पाडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता 350 रुपयांची नोट चलनात? RBI लवकरच करणार घोषणा?

Head Neck Cancer Symptoms: गिळताना त्रास होतोय? वेळीच व्हा सावध! डोकं अन् मानेच्या कॅन्सची असू शकतात लक्षणे

Railway Mega Block: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन दिवस पॉवर ब्लॉक; पनवेल-बेलापूर ट्रेन बंद; वेळापत्रक वाचा

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Laxmichya Paulanni : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट; ईशा केसकरची एक्झिट तर नवीन नायिकेची एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT