Maharashtra politics saam tv
मनोरंजन बातम्या

Maharashtra politics : सलमान खानची हिरोईन निवडणुकीवर संतापली, प्रचारावेळी घराजवळ लागली आग, पाहा भयंकर VIDEO

Daisy Shah Angry On Election Campaign : सध्या सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात प्रचारादरम्यान एक भयंकर घटना घडली आहे. ज्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री चांगलीच भडकली.

Shreya Maskar

BMC निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.

सर्वत्र निवडणुकीचा प्रचार पाहायला मिळत आहे.

अशात प्रचारादरम्यान एक भयंकर घटना घडली आहे, ज्याची माहिती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने दिली आहे.

सध्या BMC निवडणुकीचा माहोल पाहायला मिळत आहे. आपल्या नेता विजयी व्हावा यासाठी प्रचार देखील होताना दिसत आहे. उमेदवार घरोघरी जाऊन लोकांची मत मिळावी यासाठी प्रचार करत आहे. मात्र या सर्वात एक भयंकर घटना घडली आहे. ज्याचा खुलासा सलमान खानची हिरोईन आणि बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाहने केला आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वत्र खळबळ उडवली आहे.

डेझी शाहने शेअर केलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रचारा दरम्यान इमारतीला आग लागली आहे. व्हिडीओत स्पष्ट आग लागलेली इमारत पाहायला मिळत आहे. तिच्या घरा शेजारील इमारतीला आग लागली आहे. लोकांनी प्रचारा दरम्यान फटाके फोडले आणि त्यातून ही आग लागल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. तिने या व्हिडीओला संतापजनक कॅप्शन लिहिलं आहे. ज्यात तिने BMC निवडणुकीचा प्रचार करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

डेझी शाह पोस्ट

"माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही...पण जेव्हा तुम्ही तुमच्या निवडणुकांसाठी प्रचार करण्यासाठी टीम्सना कामावर ठेवता, तेव्हा कृपया खात्री करा की त्यांच्यात काहीतरी सामान्य ज्ञान असेल. सुदैवाने, आमच्या बिल्डिंग कमिटीने त्यांना घरोघरी जाण्यास मनाई केली. इमारतींच्या शेजारी फटाके फोडणे हे काही योग्य नाही. जेव्हा लोकांमध्ये नागरिकत्वाची जाणीव नसते, तेव्हा असेच घडते. ही काही नैसर्गिक आपत्ती नाही, तर ती मेंदू नसलेल्या लोकांमुळे घडली आहे. जबाबदारी स्वीकारा. आता वेळ आली आहे..."

डेझी शाहने व्हिडीओत म्हटल्यानुसार, इमारतीला आग लागल्यामुळे लोक खाली जमली आहेत. ती आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचार करणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फटाके फोडले. ज्यामुळे इमारतीमधील एका घराला आग लागली. आग लागल्यानंतर ते प्रचारक पळून गेले. ही लोक इमारतीमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. अभिनेत्री डेझी शाहने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. लोक संताप व्यक्त करताना दिसत आहे. नाराजी व्यक्त करत आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Arijit Singh: 'बॉर्डर २'मुळे अरिजीत सिंगने सोडलं प्लेबॅक सिंगिंग; प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलं खरं कारण

India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

Trending Mangalsutra Designs: महिलांना आवडणाऱ्या मंगळसूत्राच्या ट्रेडिंग्स 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT