Anant Ambani Radhika Merchant Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding : नवदाम्पत्य अनंत-राधिकाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले शुभ आशीर्वाद, कार्यक्रमाला राजकीय मंडळींनी लावले चार चाँद

Anant Ambani Radhika Merchant Wedding : राज्यासह देशातील अनेक महत्वाचे राजकीय मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते.शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्नाला उपस्थिती लावली होती.

Chetan Bodke

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल मुंबईत 'शुभ आशीर्वाद' सोहळा पार पडला. या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. यावेळी राज्यासह देशातील अनेक महत्वाचे राजकीय मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते.शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्नाला उपस्थिती लावली होती.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या 'शुभ आशीर्वाद' सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि नेते शरद पवारही यावेळी 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिले. याशिवाय, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, खासदार चिराग पासवान, सोबत त्यांची आई सह काही राज्याचे मुख्यमंत्रीही यावेळी 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला उपस्थित होते.

'शुभ आशीर्वाद' सोहळ्या दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे दोघेही बोलत असतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. अत्यंत शाही आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडला. यावेळी लग्नाला अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान आणि माधुरी दीक्षितसह बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली. सर्व उपस्थितांनी यावेळी नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT