Sanman Maharashtracha 2023 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanman Maharashtracha 2023: दैदिप्यमान सोहळा रंगणार, ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’मध्ये महेश कोठारेंसह दिगपाल लांजेकरांचा होणार सन्मान...

महाराष्ट्राची ओळख आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिक ठसठशीत करणाऱ्या मान्यवरांचा 'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' या पुरस्कार सोहळ्यातून सन्मान होणार आहे.

Chetan Bodke

Sanman Maharashtracha 2023 Award: महाराष्ट्र राज्याची अद्भुत विचारांची, विवेकाची, समृद्ध कलेची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राची ओळख राजे-महाराजे, संत-कलावंत, सुधारक-समाजसेवक यांमुळे सर्वाधिक आहे. या मातीशी ज्याचं नातं जुळलं ते खरोखरच भाग्यवान ठरले. अनेकांच्या योगदानातून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली. महाराष्ट्राच्या मातीतल्या सर्वांना अपरंपार आनंद देत महाराष्ट्राची ओळख आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिक ठसठशीत करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करणारा 'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपन्न होणार आहे.

‘अर्थ’ या संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या संस्थेतर्फे दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानात ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या कार्यकर्तृत्वातून आणि कष्टातून ज्यांनी महाराष्ट्राचे नाव गाजवले, ज्यांनी इथं प्रगती घडवून आणली, अशा महाराष्ट्राच्या असामान्य धुरिणींचा आणि संस्थांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. (Marathi Film)

राजकारणापासून तंत्रज्ञानापर्यंत, व्यवसायापासून कलेपर्यंत अनेक प्रकारच्या क्षेत्रांत महाराष्ट्राने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आपल्या कष्टाने आणि उपजत गुणांनी संधीचे सोने करत महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या, कर्तृत्वगुणांची दखल घेणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा सोहळा महाराष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांप्रती ऋण व्यक्त करण्याचा आनंद सोहळा आहे. या सोहळयात महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा सोहळा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.(Entertainment News)

‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिनेत्री समीरा गुजर करणार आहेत. सोशल माध्यमाद्वारे ही या सोहळ्याचा आस्वाद घेता येणार आहे. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी केलेला सन्मान असेल. आपणही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहात, म्हणूनच आपण जरूर उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

सन्मानित करण्यात येणाऱ्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे -

पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीज माता, कृषी क्षेत्र)

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)

अभिनेता आकाश ठोसर (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)

संगीतकार अविनाश चंद्रचूड व विश्वजीत जोशी (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)

य. दु. जोशी (मराठी पत्रकारिता क्षेत्र)

राहुल गडपाले, मुख्य संपादक, सकाळ माध्यम समूह (मराठी पत्रकारिता क्षेत्र)

धर्मेंद्र जोरे, राजकीय संपादक, मिड-डे ( इंग्रजी पत्रकारिता क्षेत्र)

पॉला मॅकग्लिन, सीईओ, भाडिपा (डिजिटल क्षेत्र)

मधुरा बाचल, मधुराज रेसिपी, (डिजिटल क्षेत्र)

फोकस इंडिया (डिजिटल क्षेत्र)

लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र) (Breaking News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT