Namrata Sambherao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Namrata Sambherao:'वजन वाढलेलं, अंगाला सूज आली...' नम्रता संभेरावने सांगितला गरोदरपणानंतरचा हास्यजत्रेतील कमबॅकचा अनुभव

Namrata Sambherao Interview: नम्रताने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे.

Chetan Bodke

Maharashtachi Hasyajatra Fame Namrata Sambherao:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमीच चर्चेत असते. नम्रता नेहमीच कॉमेडीचा अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. नम्रताने सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नम्रताने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे.

नम्रताने गरोदर असताना हास्यजत्रेत काम करतानाची एक गोष्ट सांगितली आहे. मित्रम्हणे या युट्यूब चॅनलला तिने मुलाखत दिली आहे. नम्रताने २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्न केले. त्यानंतर सहा वर्षींनी तिला मुलगा झाला. गरोदरपणात नम्रताने ७ व्या महिन्यांपर्यंत नम्रताने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात काम केले. याबाबतचा किस्सा तिने सांगितले आहे.

नम्रताने ती गरोदर असल्याचं समजल्यावर ही बातमी दिग्दर्शक सचिन मोटे यांनी सांगितली. सुरुवातीला त्यांना काय बोलू हे समजलंच नाही, कारण, एकीकडे दिग्दर्शक म्हणून तर एकिकडे गुरु आणि मित्र म्हणून विचार करत होते. नमा गरोदर असल्याने ती हास्यजत्रेत काम करणार नसल्याचा विचार त्यांच्या डोक्यात होता. परंतु पर्सनली ते माझ्यासाठी खूप खुश होते. जवळपास ६ वर्षांनी मी आई होणार होते.

ही गोष्ट सर्वांना कळल्यावर सर्वच खूश होते. या काळात सचिन मोटे सर, गोस्वामी सर, प्रसाद दादा, समीर दादा यांनी मला खूप साथ दिली. मी आई होणार असल्याचा आनंद खूप वेगळा होता. जेवढं शक्य होईल तेवढं काम मी करेन असं मी सर्वांना सांगितलं होते. सगळ्यांचा मदतीमुळेच मी गरोदरपणात सातव्या महिन्यांपर्यंत काम केलं. या सर्व प्रवासात मला सहकलाकारांची खूप साथ लाभली.

माझं बाळंतपण झाल्यावर मी सहा महिने ब्रेक घेतला होता. यानंतर मी पुन्हा हास्यजत्रेत आले तेव्हा माझ्या पदरात बाळ होतं. माझं वजन वाढलं होतं. सूज आली होता. त्यावेळी काम करायला सुरुवात केल्यावर माझ्या लक्षात आलं की, मी पूर्वीसारख काम होत नाही. परत आल्यावर प्रसाद आणि माझ्या स्किटवेळी मी खूप रडली.

मी माझं १०० टक्के देऊ शकत नव्हते हे मला माहित होतं. त्यामुळे जास्त वाईट वाटतं होतं. त्यावेळी मोटे सर आले त्यांनी माझी विचारपूस केली. ते म्हणाले की, तू फक्त २ तास सरावासाठी ये. पूर्णवेळ रुद्राजला दे. तु जाडी झालीयेस, चेहरा मोठा झाला या गोष्टींचा विचार करु नये. त्यांच्या या आत्मविश्वासानेच मी पुन्हा नवीन ऊर्जेने कामाला लागली'. असं नम्रता म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT