Namrata Sambherao: रिअल लाईफसोबत रिल लाईफमध्ये एकत्र, नम्रता संभेरावसोबत पतीही दिसणार ‘या’ चित्रपटात

Namrata Sambherao New Film: रिअल लाईफमध्ये एकत्र दिसणारं कपल रील लाईफमध्येही लवकरच एकत्र दिसणार आहेत.
Namrata Sambherao And Yogesh Sambherao New Film
Namrata Sambherao And Yogesh Sambherao New FilmSaam Tv

Ekda Yeun Tar Bagha

दिवाळीमध्ये नवरा बायकोचे नाते साजरा करण्याचा दिवस म्हणजे पाडवा. दिवाळी पाडवा हा प्रत्येक जोडप्यासाठी खासच असतो. दरवर्षी सर्वच नवरा- बायको जल्लोषामध्ये सण साजरा करतात. या सणाची क्रेझ सामान्य नागरिकांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींमध्येही पाहायला मिळते. यंदाचा दिवाळी पाडवा हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावसाठी खूपच खास आहे. सध्या अभिनेत्री ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. (Marathi Actress)

Namrata Sambherao And Yogesh Sambherao New Film
Badshah On Mrunal Thakur: मृणाल ठाकूर आणि बादशाह खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का?, रॅपरने सांगितलं ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य

अभिनेत्री नम्रताला तिच्या पतीने पाडव्यानिमित्त खास भेट दिली आहे. त्यामुळे नम्रता खूपच खुश आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या गिफ्टची चांगलीच चर्चा होत आहे. येत्या ८ डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट रिलीज होत आहे. तिच्या सोबत चित्रपटामध्ये तिचा नवरा योगेश संभेराव सुद्धा दिसणार आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’मध्ये नम्रताचा नवरा योगेश संभेराव एका छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे. रिअल लाईफमध्ये एकत्र दिसणारं कपल रीलमध्येही एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत. (Marathi Film)

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंटी, दिपक कृष्ण चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.

दिग्दर्शक, लेखक, अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, राजेंद्र शिसातकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठीफौज चित्रपटात दिसणार आहे. (Entertainment News)

Namrata Sambherao And Yogesh Sambherao New Film
Mitali Mayekar आणि Siddharth Chandekar च्या घरी लक्ष्मीचं आगमन, व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com