Sahil Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेता साहिल खानच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

मुंबई, ता. २७ एप्रिल २०२४

महादेव बुक ऑनलाईन बॅटिंग ॲप प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेता साहिल खानच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन बेटिंग प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता साहिल खानच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ऑनलाइन बेटिंग एप्लीकेशन्सचे प्रमोशन केल्याचा साहिल खान याच्यावर आरोप आहे.

या प्रकरणात याआधी सत्र न्यायालयाने साहिल खानचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर साहिल खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटल्यानंतर साहिल खानच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने साहिल खानचा जबाब नोंदवला आहे.

या संपूर्ण गुन्ह्याचे व्यापक स्वरूप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सध्याच्या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कारवाई बेकायदेशीर असल्याचे दिसून येत आहे.. मोठ्या प्रमाणात बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापरण्यात आली आहेत, त्यामुळे खानविरुद्ध उपलब्ध साहित्य पाहता आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्याला अटकेतून दिलासा देता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT