Bollywood Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Bollywood Actor Arrested : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्यावर महिलेने फसवणुकीचे आरोप केले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्याला अटक

लग्नाचं आमिष दाखवून महिलेला फसवल्याचा आरोप

अभिनेत्याला पोलीसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर 'महाभारत' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आणि कुस्तीपटू सौरव गुर्जर (Saurav Gurjar) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आणि छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. गचीबोवली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २०२१ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या महिलेची सौरव गुर्जरशी ओळख झाली आणि त्यानंतर व्हॉट्सॲपवर त्यांच्यातील जवळीक वाढली. २५ डिसेंबर २०२१ रोजी ते पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटले आणि त्याने तिला लग्नाचे तसेच पत्नीचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले, असा आरोप महिलेने केला आहे. ती अमेरिकेत असताना आणि भारतात परतल्यानंतरही ते एकत्र राहत होते. आपण दोघे मिळून व्यवसाय करू, असे आश्वासन देऊन त्याने तिला अमेरिकेतील नोकरी सोडण्यास प्रवृत्त केले होते, असा दावा तिने केला.

महिलेने आरोप केला की, अभिनेत्याच्या वागणुकीमुळे तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते. जेव्हा जेव्हा ती त्याला लग्नाबद्दल विचारायची, तेव्हा तो तिचा नंबर ब्लॉक करायचा आणि तिच्यापासून दूर राहायचा. सौरव गुर्जर ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या काळात तिच्यासोबत राहिला होता, असा दावाही महिलेने केले आहे.हैदराबादमध्ये एकत्र राहिल्यानंतर, त्याने तिला काहीही न सांगता अचानक तिथून निघून गेला.

तक्रारीच्या आधारे गचीबोवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी सौरव गुर्जरला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला हैदराबादला आणले. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाही. पोलीस तपास सुरू आहे.

सौरव गुर्जरची कारकीर्द

सौरव गुर्जरने २०१३ मध्ये टेलिव्हिजनवर आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. स्टार प्लसवरील 'महाभारत' या मालिकेतून त्याने पदार्पण केले, ज्यात त्याने 'भीम'ची भूमिका साकारली होती. ही मालिका २०१३ ते २०१४ या काळात प्रसारित झाली. त्यानंतर २०१६ ते २०१७ दरम्यान 'संकटमोचन महाबली हनुमान' या मालिकेत त्याने रावण आणि बाली यांच्या भूमिका साकारल्या. २०२२ मध्ये 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Bandh : २ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक; महाराष्ट्रातही पडणार पडसाद, बड्या नेत्याची घोषणा

तिन्ही ठाकरे आंदोलनाच्या मैदानात; शिवसेना भवनाबाहेर जोरदार गोंधळ, आदित ठाकरेंनी अडवली पोलिसांची व्हॅन

Maharashtra News Live Update: आदित्य - तेजस- अमित ठाकरेंनी पोलिस व्हॅन अडवली

Saasre Bapre: एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी! भरत जाधवचा 'सासरे बापरे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pimpri-Chinchwad Forts : वीकेंडला किल्ले फिरायचंय? पिंपरी-चिंचवडजवळ आहेत 'हे' ७ ऐतिहासिक गड-किल्ले

SCROLL FOR NEXT