Madhuri Dixit Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit Video : 'कहीं आग लगे लग जावे...'; धकधक गर्लच्या डान्सने नेटकरी घायाळ, हुक स्टेप्सनं वेधलं लक्ष

Madhuri Dixit Dance Video : बॉलिवूडची सुपरस्टार माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात माधुरी दीक्षित ऐश्वर्या रायच्या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहे.

Shreya Maskar

माधुरी दीक्षितचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षित ऐश्वर्या रायच्या गाण्यावर थिरकली आहे.

माधुरी दीक्षितच्या हटके डान्सवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit ) कायम आपल्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. माधुरी दीक्षितचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या लूकचे आणि डान्सचे रील ती चाहत्यांसोबत शेअर करते. आता देखील माधुरी दीक्षितने एक छान डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात माधुरी दीक्षितचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

माधुरी दीक्षितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि तिच्या मैत्रिणी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. माधुरी दीक्षित यांनी 'कहीं आग लगे लग जावे' या गाण्यावर रील बनवली आहे. 1999 साली रिलीज झालेल्या 'ताल' चित्रपटातील हे गाणे आहे. चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. सध्या 'ताल' चित्रपटातील 'कहीं आग लगे लग जावे' हे गाणे सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे.

माधुरी दीक्षित आणि त्यांच्या मैत्रिणी 'कहीं आग लगे लग जावे' गाण्याच्याहुक स्टेपवर थिरकले आहेत. व्हिडीओतील माधुरी दीक्षितच्या अदा, चेहऱ्यावरचे हावभाव सर्वच मनाला घायाळ करणारे आहे. या व्हिडीओला माधुरीने खूप खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "Thoda ड्रामा, thoda जलवा" तसेच या व्हिडीओवर चाहते आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्साचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये माधुरी गॉगल लावून स्वॅगमध्ये डान्स करताना दिसत आहे.

माधुरी दीक्षितने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहे. अलिकडेच माधुरी दीक्षित 'भूल भुलैया 3 ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. माधुरी दीक्षितला बॉलिवूडमध्ये 'धक धक गर्ल' च्या नावाने ओळखले जाते. चाहते आता माधुरी दीक्षितच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

SCROLL FOR NEXT