निरज चोप्रावर चित्रपट येणार? मधुर भंडारकर यांच्या भेटीनं चर्चांना उधाण  Saam Tv
मनोरंजन बातम्या

निरज चोप्रावर चित्रपट येणार? मधुर भंडारकर यांच्या भेटीनं चर्चांना उधाण

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुर्वणपदक मिळालेले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत मोठा इतिहास रचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोक्यो ऑलिम्पिक Tokyo Olympics स्पर्धेमध्ये भारताला India सुर्वणपदक मिळालेले आहे. भालाफेकपटू Javelin throw नीरज चोप्राने Niraj Chopra सुवर्ण पदक पटकावत मोठा इतिहास रचला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर चांगलाच कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडिया Social media पोस्टद्वारे नीरजचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.

दरम्यान, बॉलिवूड Bollywood मधील दिग्गज चित्रपट निर्माते मधुर भंडारकर Madhur Bhandarkar ​यांनी नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली आहे. यानंतर त्या दोघांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत. ईटाइम्सने मधुर भंडारकर यांच्याशी संवाद साधला आहे. तेव्हा ते म्हणाले होते की, स्वातंत्र्यदिनानिमित्त मी दिल्लीमध्ये आहे.

हे देखील पहा-

मी टोक्यो ऑलिम्पिक मधील स्पर्धकांना त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल शुभेच्छा देण्याकरिता भेटलो होतो. पुढे ते असेही म्हणाले की, मी नीरजला म्हणालो तू सुपरस्टार झाला आहेस आणि देशभरात तुझे खूप मोठ्या प्रमाणात लाखो चाहते झाले आहेत. मजेशीर अंदाजात पुढे म्हणाले की नीरज तू गूड लूकींग आहे. यामुळे चित्रपटाच काम करण्याचा काही विचार केला आहे का? यावर उत्तर देत नीरज म्हणाला की, मला अभिनय करण्याची इच्छा नाही.

मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. नीरजने त्याचे पुढचे प्लॅन तयार केले असल्याचे मधुर भंडारकर यांनी यावेळी सांगितले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये २ पदके जिंकली होती.

परंतु, ते इंग्रज होते. भारतीय नव्हते, नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा आता संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलेले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT