Maa Music Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maa Music Video: तुलसी कुमारची आईला प्रेमळ साद; मातृत्वाच्या भावना साजरा करणारं नवं गाणं प्रदर्शित

Maa Music Video: तुलसी कुमारचं नवीन गाणं ‘माँ’ हे एका आईच्या शुद्ध, निस्वार्थ प्रेमाचं प्रामाणिक दर्शन घडवतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maa Music Video: तुलसी कुमारचं नवीन गाणं ‘माँ’ हे एका आईच्या शुद्ध, निस्वार्थ प्रेमाचं प्रामाणिक दर्शन घडवतं. पायल देव यांचं संगीत, मनोज मुंतशिर शुक्ला यांचे अर्थपूर्ण शब्द आणि रंजू वर्गीस यांचं दिग्दर्शन हे गाणं केवळ एक सॉंग नसून, आई आणि मुलगी या दोघींच्या दृष्टिकोनातून व्यक्त झालेली एक हृदयस्पर्शी भावना आहे.

तुलसी, ज्या स्वतः आई आहेत, त्या या सादरीकरणात एक विशेष भावनिकता आणि ताकद घेऊन आल्या आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्या कोरिओग्राफीने आणखी भावनिक खोली निर्माण केली आहे – प्रत्येक हालचालीत एक निरागसतेचा, प्रेमाचा स्पर्श आहे, जणू आई-मुलाच्या नात्याचं दृश्य रूपांतरण.

या गाण्याविषयी बोलताना तुलसी म्हणाल्या, "हे गाणं माझ्या मनाला अतिशय जवळचं आहे. हे खूप खोलवरच्या भावनांमधून निर्माण झालं आहे. एक मुलगी आणि आई या दोन्ही नात्यांतून मी प्रत्येक ओळीला अनुभवलं. कोरिओग्राफी माझ्यासाठी नवीन होती – प्रत्येक शब्दाला शरीराच्या हालचालीतून व्यक्त करायचं होतं. रंजू आणि कदंबरीने जे काही तयार केलं, ते मला खूप आवडलं. सादर करताना असं वाटलं की मी माझ्या आतल्या भावना बोलून दाखवत होते, ज्या शब्दात व्यक्त करणं कठीण होतं."

व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री झरीन वहाब यांचा समावेश आहे, आणि काही भावनिक सीन शूट करताना त्या स्वतःही अश्रू अनावर झाल्या. ‘माँ’ हे गाणं आता सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. व्हिडिओ T-Series च्या YouTube चॅनलवर नक्की पाहा आणि गाणं Spotify वर ऐका.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती नाही

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT