Subodh Bhave News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pune Loksabha News : '...अन्यथा शिक्षा व्हायला हवी'; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला

Subodh Bhave News : पुण्यामध्ये अभिनेता सुबोध भावेने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. 'सुट्टी देऊनही मतदान केलं नाही तर शिक्षा व्हायला हवी.' अशी प्रतिक्रिया त्याने दिलेली आहे.

Chetan Bodke

देशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून अनेक नागरिक सध्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. नागरिकांसोबतच अनेक मराठी सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. आज सकाळी पुण्यात अभिनेते अमोल कोल्हे, सुबोध भावे, राहुल देशपांडे, मोहन आगाशे, बेला शेंडे, श्रृती मराठे आणि सोनाली कुलकर्णी यांनी आज पुण्यात मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यात आज ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात शिरुर, छत्रपती संभाजी नगर, पुणे अशा अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. यावेळी पुण्यामध्ये, अभिनेता सुबोध भावेने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमासोबत संवाद साधला होता. अभिनेता सुबोध भावे म्हणतो, "जर तुम्ही सुट्टी देऊनही मतदान केलं नाही तर, तो राष्ट्रीय गुन्हा म्हणून जाहीर करावा. यासाठी शिक्षा व्हायला हवी. जोपर्यंत शिक्षा होत नाहीना तोपर्यंत मतदानाची भावना आपल्या मनात तयार होत नाही. आपल्याकडे शिक्षा झाल्यानंतरच नियमांचं महत्व कळतं. तर तसं जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्याचं महत्व आपल्या मतदारांना कळणार नाही."

तर श्रुती मराठेनेही प्रतिक्रिया दिलेली आहे. ती म्हणते, "मतदानाचा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच आहे. नंतर आपण ५ वर्षे रडून कुठलं सरकार आलं हे करण्यापेक्षा हक्क बजावलेला बरा." मतदान करत नाही, त्या लोकांवरही तिने टीका केली आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, "जर जाणीव असती तर सुट्टी घेतली नसती. ही सुट्टी जाऊन मज्जा मस्ती करण्याची नाही. तुम्हाला मिळालेला जो हक्क आहे, तो वापरण्याची आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कृपया वेळेतच जाऊन तुम्हीही मतदानाचा हक्क बजवावा." अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT