Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार: मुख्यमंत्री

CM Eknath Shinde News: स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रम व जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळापूर ता. हवेली जिल्हा पुणे येथे झाली.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Tv
Published On

Chhatrapati Sambhaji Maharaj:

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ही दोन्ही स्मारक स्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी करण्यासाठी शासन अत्याग्रही असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रम व जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळापूर ता. हवेली जिल्हा पुणे येथे झाली. यावेळी ते असं म्हणाले आहेत.

CM Eknath Shinde
Amit Shah: अमित शाह यांचा विदर्भ दौरा, लोकसभेच्या 6 मतदारसंघांचा घेणार आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा साम्राज्यापेक्षा 15 पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. त्यांनी अनेक लढाया केल्या संपूर्ण जीवनात हे एकही लढाई हरले नाहीत. ते प्रखर धर्माभिमानी होते . धर्मकारण , अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज राजकारणात निपुण होते. त्याचबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार शासन करीत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचे कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

CM Eknath Shinde
Lok Sabha Election 2024: भाजपने दिल्लीत प्रवेश वर्मा यांच्यासह 4 उमेदवारांचं कापलं तिकीट, मनोज तिवारी यांना पुन्हा संधी

गुलामीची बंधने झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही, असे सांगून त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com