Yash Chopra Birth Anniversary Saam TV
मनोरंजन बातम्या

Yash Chopra's Birth Anniversary: 'इंग्लंडला जाण्यासाठी मुंबईत आले अन...' कशी झाली रोमान्स किंग यश चोप्रा यांच्या फिल्मी करियरची सुरुवात

Yash Chopra: यश चोप्रा यांचा २७ सप्टेंबरला लाहोर येथे झाला.

Pooja Dange

Yash Chopra Birthday Special:

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते आणि दिगदर्शक यश चोप्रा यांची आज जयंती आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. यश चोप्रा यांना रोमान्स किंग म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या चित्रपटातून प्रेमाची परिभाषाच बदलून टाकली. यश चोप्रा यांचे चित्रपट पाहूण लोक प्रेम करायला शिकले.

यश चोप्रा यांनी त्यांच्या करियरची सुरुवात एका छोट्या खोलीतून केली. यश चोप्रा यांनी जे यश मिळवले त्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यांनी अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. बॉलिवूडला यश चोप्रा यांनी अनेक सुपरस्टार दिले. त्यांचे चित्रपट आजची तरुण मंडळी देखील आवडीने बघतात.

यश चोप्रा यांचा जन्म २७ सप्टेंबरला लाहोर येथे झाला. त्यांच्या घरच्यांना त्यांना इंजिनियर बनवायचे होते. परंतु यश चोप्रा यांना चित्रपटसृष्टीत काम करायचे होते. यश चोप्रा जेव्हा १९ वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे भाऊ बी. आर. चोप्रा दिग्दर्शक म्हणून काम करत होते. तर त्यांचा दुसरा भाऊ कॅमेरामन होता आणि तिसरा भाऊ डिस्ट्रिब्युटर. त्यामुळे यश चोप्रा यांच्या वडिलांना वाटत होते घरातली कोणीतरी दुसरे क्षेत्र निवडावे.

यश चोप्रा यांना जालंधरवरून मुंबईत पाठविण्यात आले. जेणेकरून ते पासपोर्ट बनवून इंजिनीरिंग शिकण्यासाठी इंग्लंडला जातील. यश चोप्रा मुंबईला आले खरे पण त्यांना इंजिनियर बनण्यात अजिबात रस नव्हता.

एकदा यश चोप्रा म्हणाले होते, 'मी एक खिळा देखील भिंतीवर ठोकू शकत नाही आणि आजही ते जमत नाही.' मुंबईत आल्यानंतर यश चोप्रा यांनी ठरवलं की ते दिग्दर्शकच बनणार. त्यांना इंजिनीअर बनण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना त्यांच्या भावाप्रमाणे दिग्दर्शक बनायचे होते. त्यांना फिल्मी जग खूप जवळचे वाटत होते.

७० च्या दशकात यश चोप्रा यांनी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले. अमिताभ बच्चन, सलीम जावेद आणि यश चोप्रा या जबदस्त त्रिकुटाने प्रेक्षकांना 'दीवर', 'त्रिशूल'सारखे अप्रतिम चित्रपट दिले. अमिताभ बच्चन यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात यश चोप्रा यांचा सिंहाचा वाटा आहे. दोन बायकांच्या कचाट्यात सापडलेल्या पुरुषाची कथा यश चोप्रा यांनी 'दाग' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणण्याचे धाडस केले. असे असले तरी त्यांचे सगळे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले नाहीत. त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नाहीत.

८०च्या दशकात यश चोप्रा यांचे चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यश चोप्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान यामागचं कारण देखील सांगितले, '८०च्या दशकात त्यांना त्यांच्या एका चित्रपटाचे पोस्टर पाहून लक्षात आलं की त्याच्या चित्रपटामध्ये फक्त कलाकार बदलत आहेत पण गोष्ट तिचंआहे. त्यानंतर त्यांनी 'चांदनी' चित्रपट बनवला. 'चांदनी' चित्रपटासाठी यश चोप्रा यांनी इतकी मेहनत घेतली की त्याकाळी सर्वत्र फक्त 'चांदनी'च चर्चा होती. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT